Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार

पुणे ः गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत विक्रमी पाऊस झाला असला तरी, राज्यातील विविध भागात अजूनही पाऊस सर्वदूर पोहोचलेला नाही. मात्र आज शुक्रवारपास

‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य : छगन भुजबळ
भारताचा वाढता प्रभाव
भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट

पुणे ः गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत विक्रमी पाऊस झाला असला तरी, राज्यातील विविध भागात अजूनही पाऊस सर्वदूर पोहोचलेला नाही. मात्र आज शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भ, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील तीन ते चार दिवस कोकण, पुणे मुंबईत मुसळधार पाऊस बरसणार आहे.
पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. याच पार्श्‍वभूमीवर हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर मुंबई आणि ठाण्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा इशारा 14 जुलैपर्यंत आहे. तर हवामान विभागाने विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, वर्धा, गोंदीया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला. तसेच आज शुक्रवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक तर विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाडा आणि खानदेशसह इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची काही भागात हजेरी राहू शकते, असाही अंदाज दिला.

आजपासून पावसाचा यलो अलर्ट – राज्याच्या काही भागांमध्ये आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याला काही ठिकाणी अतिजोरदार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर संपूर्ण विदर्भात शुक्रवारपासून पुढील 3 दिवस ठिकठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला.

COMMENTS