जर तुम्ही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचे चाहते असाल तर, तुम्हाला सूखद धक्का देणारी बातमी आहे. लवकरच तुम्हाला त्यांच्या विमा कंपनीचे स
जर तुम्ही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांचे चाहते असाल तर, तुम्हाला सूखद धक्का देणारी बातमी आहे. लवकरच तुम्हाला त्यांच्या विमा कंपनीचे संरक्षण तर मिळेलच पण शेअर बाजारात या कंपनीत गुंतवणूकही करता येईल. त्यामुळे विमा संरक्षणसोबतच कमाईचेही दरवाजा उघडणार आहे.
गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनी असं या विमा कंपनीचे नाव आहे. या कंपनीला आणि तिच्या IPO ला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे.
भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने या आयपीओला अद्याप मंजूरी दिलेली नाही. हा आयपीओ जवळपास 1250 कोटी रुपयांचा असणार आहे.
गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीने यावर्षी 17 ऑगस्ट रोजी आयपीओ आणण्यासाठी योग्य ती आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली आहेत. कॅनाडा स्थित फेअरफॅक्स या समूहाच्या या विमा कंपनीत विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा मोठा वाटा आहे. या कंपनीच्या आयपीओला विमा नियामक प्राधिकरणाने हिरवा झेंडा दाखविला. त्यांनी आयपीओला मंजूरी दिली आहे. सेबीच्या मंजूरीनंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.
COMMENTS