Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राचार्य शेळके यांचा सत्कार म्हणजे माणुसकीचा सन्मान ः प्रताप देवरे

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्था ही बहुजनांच्या ज्ञानसंवर्धनासाठी स्थापन झाली, अशा सेवाभावी संस्थेचे माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांना त्यांच्या आदर

गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांवर अन्याय
निळवंडे कालव्यांच्या कामांची अभियंता बाळासाहेब शेटे यांनी केली पाहणी
सुरत-हैदराबाद महामार्गाची अधिसूचना पुन्हा आली

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्था ही बहुजनांच्या ज्ञानसंवर्धनासाठी स्थापन झाली, अशा सेवाभावी संस्थेचे माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांना त्यांच्या आदर्श शैक्षणिक योगदानामुळे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला,त्याबद्दल त्यांचा सत्कार म्हणजे ज्ञानयुक्त माणुसकीचा सन्मान होय असे विचार श्रीरामपूर रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी स्नेहग्रुप संघटनेचे संस्थापक प्रताप देवरे यांनी व्यक्त केले.
    येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांना स्व. अ‍ॅड. रावसाहेब शिंदे स्मृती जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला, त्याबद्दल त्यांचा स्नेहग्रुप ह्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मार्केट यार्ड शिवाजीनगर भागातील शेळके हॉलमध्ये सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्रताप देवरे बोलत होते. प्रारंभी स्नेहग्रुपचे सदस्य डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून उपस्थितांची ओळख करून दिली. श्रीरामपूर नगर पालिका सेवकांच्या पतसंस्थेचे मॅनेजर चंद्रकात मगरे, प्रा. शिवाजीराव बारगळ,सामाजिक कार्यकर्ते सुरेश देवकर, श्रावण भोसले, भास्करराव नरवडे आदी माजी विद्यार्थ्यांनी प्राचार्य शेळके यांचा अभिनंदनपूर्वक सत्कार करून त्यांच्या आदर्श मार्गदर्शनामुळे आणि अध्यापनामुळेच आमचे जीवन घडले, त्यांना मिळालेला पुरस्कार म्हणजे एक समर्पित रयतनिष्ठ ज्ञानर्षीचा पुरस्कार असल्याचे गौरवोदगार काढले. प्रताप देवरे यांनी स्नेहग्रुप ही श्रीरामपूरच्या रयत संकुलातील माजी विद्यार्थी संघटना आहे. मित्रत्वाच्या नात्यातून, बांधू सेतू स्नेहातून या ध्येयशील संकल्पनेतून       स्नेहग्रुपची स्थापना 2010 पासून झाली. अनेक मेळावे, ’ स्नेही’ स्मरणिका आणि कर्मवीर रत्न पुरस्काराने अनेकांना सन्मानीत केले असून1975ते1985 या काळातील 339 माजी विद्यार्थी या संघटनेत कार्यरत आहेत. प्राचार्य शेळके यांचे यासाठी मोठे योगदान आहे, त्यांना मिळालेला पुरस्कार हा प्रेरणादायी असल्याचे देवरे यांनी सांगून शाल, पुष्पहार, पुस्तके, भेटवस्तू देऊन प्राचार्य शेळके यांचा सन्मान केला. प्राचार्य शेळके यांनी आपला जीवनप्रवास आणि रयतमधील सातारा, पुणे, श्रीरामपूर येथील अनेक शैक्षणिक अनुभव सांगितले. अनेक चांगली माणसे भेटली, कर्मवीराच्या विचारांना मनीमानसी जपणारी सेवाभावी रयतनिष्ठ माणसे भेटली, त्यांच्यामुळे1967ते2002 पर्यंतचा नोकरी शिक्षणप्रवास फलदायी ठरला, अशा भेटलेल्या आदर्श माणसांचा हा सन्मान आहे. अड, रावसाहेब शिंदे यांच्या प्रामाणिक आग्रहामुळे आपण श्रीरामपूर निवासी झालो, असे सांगून स्नेहग्रुपच्या प्रेमाबद्दल कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ’ग्रंथसंवाद’ व’ माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ ही नवी पुस्तके भेट देऊन सर्वांचा सत्कार केला. सूत्रसंचालन केले. प्रा. अनिता शेळके यांनी नियोजन केले तर प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आभार मानले.

COMMENTS