Homeताज्या बातम्यासंपादकीय

बंडखोरीची टांगती तलवार !

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असतांना राज्यात बंडखोरीची टांगती तलवार दिसून येत आहे. त्यातून राजकीय भ

विकासांच्या मुद्दयांना बगल
‘नीट’चा घोळ
अमृत महोत्सवी वर्ष आणि विकासाचा आलेख

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असतांना राज्यात बंडखोरीची टांगती तलवार दिसून येत आहे. त्यातून राजकीय भूंकप पुन्हा एकदा होण्याचे संकेत दिसून येत आहे. मुळातच महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे अनेक इच्छूकांना उमेदवारी मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी इतर पर्यायाचा शोध घेत असलयाचे दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी खासदार शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट घेतली. त्यामुळे पिचड पिता-पुत्र पुन्हा एकदा तुतारी घेण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता पिचड पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अनेक वर्षांचा कालावधी उलटला आहे. असे असतांना त्यांना ऐन निवडणुकीच्या काळातच तुतारी हाती घेण्याची गरज का पडावी ? यामागची कारणे शोधण्याची गरज आहे. वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल्या आणि सर्वाधिक जागा महाराष्ट्रात मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात नकारात्मक वातावरण तयार होत असल्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजना आणत महाराष्ट्रात एक सकारात्मक वातावरण निर्मिती केली. त्यानंतर बदलापूर घटनेवरून जे काही घडले आणि सिंधुदुर्गमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यातून महाराष्ट्रात एक संतापाची लाट उमटली होती. बदलापूर घटनेतील आरोपीचे एन्काउंटर हा एक त्यातीलच महत्वाचा दूवा आहे. कारण त्यामुळे आम्ही अशा नराधमांना माफ करत नाही,

तर त्यांना तात्काळ शिक्षा दिल्याचा हा एक छुपा संदेश होता. मात्र या सर्व बाबाी पाहिल्या तरी बंडखोरीची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता काही तासांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात जागावाटपावरून चर्चा झाली. या चर्चेतील तपशील समोर आला नसला तरी, भाजप किमान 160 जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित जागा शिंदे आणि पवार गटासह काही मित्रपक्षांना मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शिंदे गट आणि पवार गट किमान 80 जागा मिळाव्या यासाठी आग्रही आहे. त्यामुळे जागावाटप लवकर होण्याची शक्यता नाही, अशावेळी आमदारकीची आस लावून असलेल्या अनेकांना भीती वाटत असल्यामुळे आणि शिवाय अनुकूल वातावरण महाविकास आघाडीकडे असल्यामुळे बंडखोरीची टांगती तलवार दोन्हीकडे असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील काँगे्रस सर्वाधिक जागा घेण्यास इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे खा. शरद पवार देखील कमी जागा पदरात पाडून घेण्यास इच्छूक नाही. कारण लोकसभेमध्ये केवळ 10 जागा लढून 8 खासदार विजयी झाल्यामुळे शरद पवारांची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे गट यावेळेस बॅकफूटवर जातांना दिसून येत आहे. शिवाय महायुतीचा सर्वाधिक विरोध हा ठाकरे गटाला आहे. काँगे्रससह शरद पवारांचे आमदार निवडून आले तरी चालतील पण ठाकरे गटाचे निवडून येणार नाही, याची पुरेपूर काळजी महायुती घेतांना दिसून येत आहे. कारण खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे हे गृहीतक यानिमित्ताने मांडता येईल हा त्यामागचा विचार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रात बंडखोरीचे मोठे पेव फुटण्याची शक्यता आहे. शिवाय महायुतीमध्ये जर भाजपने सर्वाधिक 160 जागांवर लढले आणि शिंदे गट आणि अजित पवार गटाला जर कमी जागा मिळाल्या तर, त्यांच्यातील अनेक नाराज आमदार पुन्हा एकदा स्वगृही परतू शकतो, त्यामुळे बंडखोरी अटळ असल्याचे दिसून येत आहे. 

COMMENTS