Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतरत्न राजीव गांधी विद्यालयात गुरूंचे पुष्पवृष्टीने केले स्वागत

बीड प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीत गुरु देवा समान म्हणून गुरुपौर्णिमेला गुरुपूजनाचा मान दिला जातो भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मांगवडगाव

आदिवासी समाज नेहमीच अग्रेसर – वाघेर
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पेटणार !
चालत्या गाडीवर पडली वीज

बीड प्रतिनिधी – भारतीय संस्कृतीत गुरु देवा समान म्हणून गुरुपौर्णिमेला गुरुपूजनाचा मान दिला जातो भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मांगवडगाव ता. केज जिल्हा बीड येथिल शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून,पुष्प वर्षाव करत शिक्षकांचे स्वागत केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक  खोसे डी एस यांनी गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असुन गुरुचे कार्य हे एक महान कार्य आहे. गुरु आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्या जवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देत असतो. गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्यांची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहूनच गुरूला खरा आनंद मिळत असतो असे सांगून, गुरुला शिष्याची गरज असते व शिष्यालाही गुरुची गरज असते. शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असली पाहिजे. आपल्या गुरूकडून मिळालेले ज्ञान त्याने आचरणात आणले पाहिजे.
प्राचीन काळापासून गुरु शिष्याची ही परंपरा चालत आली आहे. उदाहरणार्थ एकलव्य – द्रोणाचार्य, कृष्ण – अर्जुन, अर्जुन –  द्रोणाचार्य, रामकृष्ण – परमहंस तसेच अलीकडच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात मानलेले तीन गुरु 1) तथागत भगवान गौतम बुद्ध, 2) संत कबीर व 3) महात्मा ज्योतिबा फुले या गुरु शिष्यांच्या नात्याविषयी विद्यार्थ्यांना यावेळी माहिती सांगण्यातली. आपल्या आयुष्यात जर आपल्याला प्रगती करायची असेल तर गुरु शिवाय तरुण उपाय नाही आणि म्हणून आपल्या आयुष्यात ज्यांनी ज्यांनी आपल्याला चांगले मार्ग दाखवले ज्ञान दिले त्या सर्व गुरूंची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते आणि म्हणून आषाढ महिन्यात येणार्‍या या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंचे पूजन केले जाते. असे सांगून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता आठवीतील विद्यार्थीनींनी केले होते. शाळेच्या प्रवेशद्वारापासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत मुलींनी भव्य रांगोळी काढून व फुलांनी रस्ता सजवला होता. शाळेतील सर्व शिक्षकांचे आगमन होताच मुलींनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते शाळेच्या मुख्य  इमारतीपर्यंत शिक्षकांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करून व टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कु. आचल प्रमोद तोडकर, वैष्णवी नरसिंग गायके, सृष्टी विकास थोरात, माहेश्वरी रामदास निर्मळ, गीता बबन इंगळे व इतर विद्यार्थिनींनी केले होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. खोसे डी एस, सहशिक्षक डोईफोड व्ही यू, चव्हाण बी जी, वाघमारे आर एस, राऊत आर आर, मैंद्रे पी ओ, भापसे एम बी, मुंडे बी एस, सेवक इंगळे व्ही एस, लांडगे एस एम व शालेय पोषण आहार मदतनीस सौ. काकडे बाई या सर्वांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाऊसाहेब चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सृष्टी विकास थोरात व वैष्णवी नरसिंग गायके यांनी केले. उपस्थित सर्व विद्यार्थी व कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या सर्वांचे शाळेतील चित्रकला शिक्षक श्री. रंजितकुमार वाघमारे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा शेवट खाऊ वाटपाने करण्यात आला.

COMMENTS