Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासदरात 6.8 टक्क्यांची वाढ अपेक्षित

महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, बुधवारी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळाच्य

धनंजय महाडिक यांची राज्यसभेवर निवड; राष्ट्रवादी कार्यकर्ते महाडीक यांच्या संपर्कात
राज्यात गुंतवणुकीचे 1 लाख 37 हजार कोटींचे करार
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, बुधवारी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळाच्या पटलावर मांडला, यानुसार राज्याच्या आर्थिक विकास दरात 6.8 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. उद्योगात 6.1 टक्के, तर कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2 टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज गुरुवारी अर्थमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असून, अर्थसंकल्पाच्या पेटार्‍यात नेमके काय दडले अशी राज्यातील सर्वसामान्यांना उत्सुकता असतांनाच, फडणवीस यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर करत अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली. 31 मार्च रोजी संपणार्‍या 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा विकास दर 6.8 टक्के आणि देशाचा विकास दर 7 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 10.2 टक्के, उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के, सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सन 2022-23 च्या पुर्वानुमानानुसार दरडोई राज्य उत्पन्न 2.42 लाख रुपये अपेक्षित आहे, तर सन 2021-22 मध्ये ते 2.15 लाख रुपये होते. यंदा 2022-23 च्या रब्बी हंगामात 57.74 लाख हेक्टर क्षेत्रावर परेणी झाली. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत कडधान्य उत्पादनात 34 टक्के वाढ होईल असा अंदाज आहे. मात्र, तृणधान्ये, तेलबियांच्या उत्पादनात प्रत्येकी 13 टक्के घट धरण्यात आली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात यंदा राज्याचे स्थूल उत्पन्न 35 लाख 27 हजार 84 कोटी अपेक्षित आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2022-23 नुसार सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक 14 टक्के आहे. एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2022 पर्यंत राज्यातील थेट परदेशी गुंतवणूक 10.89 लाख कोटी असून ती अखिल भारताच्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीच्या 28.5 टक्के होती. नोव्हेंबर 2022 पर्यंत 108.67 लाख रोजगारासह राज्यात एकूण 20.43 लाख उपक्रम उद्यम नोंदणी अंतर्गत नोंदणीकृत होते. यामध्ये 19.80 लाख सूक्ष्म, 0.57 लाख लघु व 0.06 लाख मध्यम उद्योगांचा समावेश आहे.

कृषीक्षेत्राकडून अपेक्षा मोठया – अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अर्थसंकल्पच्या एक दिवस आधी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात मांडला. त्यात कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रात 10.2, उद्योग क्षेत्रात 6.1 आणि सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ अपेक्षित ठेवण्यात आली आहे.

COMMENTS