कोपरगावचा किराणा व्यापारी हा देशाच्या अर्थचक्राला गती व दिशा देणारा –  तनसुख झांबड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावचा किराणा व्यापारी हा देशाच्या अर्थचक्राला गती व दिशा देणारा –  तनसुख झांबड

उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे नारायण अग्रवाल यांनी मानले.

कोपरगाव प्रतिनीधी : कोपरगावातील प्रत्येक युवा किराणा व्यापारी त्यांच्या व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन, व्यवहारात पारदर्शकता आणि प्रगतीसह भारतीय अर्थव

वंचितासाठी लढा उभा करणाऱ्या संघर्ष योद्धाचा प्रवास थांबला
1 मेपासून 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस एक लस दिली जाणार आहे | पहा सकाळच्या बातम्या | Lok News24
  संशोधन क्षेत्रातील वाड;मयचौर्य नव संशोधकांसाठी धोक्याचे- प्राचार्य डॉ. अर्चना आदिक पवार

कोपरगाव प्रतिनीधी : कोपरगावातील प्रत्येक युवा किराणा व्यापारी त्यांच्या व्यवसायात सकारात्मक दृष्टीकोन, व्यवहारात पारदर्शकता आणि प्रगतीसह भारतीय अर्थव्यवस्थेला गती व दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. युवा किराणा व्यापारी हा शहराच्या नावलौकिकाबरोबरच स्वतःच्या व्यवसायाची देखील ओळख करून देत असतो. स्वतःची ओळख करून देण्याची सकारात्मक मानसिकता कोपरगावातील युवा किराणा व्यापाऱ्यांकडे आहे. हेच युवा किराणा व्यापारी कोपरगाव शहराची कॅलिफोर्निया अशी असलेली ओळख पुन्हा मिळवून देतील. त्यांच्याकडे असणारी जिद्द , कल्पनाशक्ती यामुळे मॉल संस्कृती कडून सकारात्मक गोष्टी स्वीकारून, डिजिटल तंत्रज्ञानाद्वारा बदलत्या काळानुसार व्यवसायातही बदल करावेत.असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे व्हा.चेअरमन  तनसुख झांबड(Tansukh Zambad) यांनी केले.

       तर राम बंधु मसालेचे चेअरमन हेमंत राठी युवा किराणा व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, व्यापाराच्या दृष्टीने कोपरगाव तालुक्याची असलेली ओळख आजतागायत प्रत्येक व्यापाऱ्याच्या स्मरणात असून तसे गतवैभव कोपरगाव तालुक्याला प्राप्त करून देण्यासाठी काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन द्वारा सतत नवीन नवीन उपक्रम राबविण्यात येत असतात.त्यातीलच युवा किराणा व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेला प्रोत्साहनपर सोहळा हा निश्चितच स्तुत्य असून कौतुकास्पद आहे.हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही कुठे झालेला नसेल त्यामुळे काका कोयटे यांच्या कल्पकतेला दादा द्यावी लागेल. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्यावतीने युवा किराणा व्यापारी प्रोत्साहन सोहळा आणि दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे व्हा.चेअरमन श्री.तनसुख झांबड आणि राम बंधू मसाले चे चेअरमन श्री.हेमंत राठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा सत्कार किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते युवा किराणा व्यापाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कारामुळे उपस्थित युवा किराणा व्यापारी भारावून गेले होते. प्रास्ताविकातून कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष  राजेंद्र बंब यांनी कोपरगाव तालुक्याच्या गतवैभवाची माहिती देत युवा किराणा व्यापाऱ्यांची कोपरगावच्या विकासात पुढील भूमिका आणि कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते.

     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले की, कोपरगाव शहरातील किराणा व्यवसायाला मरगळ आल्यासारखी वाटत होती. त्या परिस्थितीत ही कोपरगावातील युवा किराणा व्यापाऱ्यांनी मॉल संस्कृती आणि ऑनलाईन खरेदी,विक्री कशी फसवी आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान आणि कल्पनाशक्ती द्वारा कोपरगावकरांना दाखवून दिले.  तसेच त्यांनी व्यवसायात अधिकाधिक प्रगती करून कोपरगाव शहराची असलेली कॅलिफोर्निया अशी ओळख पुन्हा नव्याने निर्माण करावी. युवा किराणा व्यापाऱ्यांपैकी पवन डागा,  पुष्पक डागा, सार्थक बंब यांनी मनोगत व्यक्त करून या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

       या प्रोत्साहनपर सोहळ्याचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष  सुधीर डागा यांनी केले. यावेळी किराणा मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष  चांगदेव शिरोडे,  नारायण अग्रवाल,  केशवराव भवर,  गुलशन होडे,  किरण शिरोडे,  दीपक अग्रवाल आदींसह कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे नारायण अग्रवाल यांनी मानले.

COMMENTS