Homeताज्या बातम्यादेश

द ग्रेट खली दुसऱ्यांदा बनला बाबा

पत्नी हरमिंदर कौरने मुलाला दिला जन्म

नवी दिल्ली प्रतिनिधी - डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर राहिलेला दिलीप राणा उर्फ द ग्रेट खली बाबा बनला आहे. त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. एका सो

धावत्या रेल्वेतून उतरताना वकीलाचा मृत्यू
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या की घातपात ?
Raksha Khadse : पक्ष कोणताही असो मात्र एक महिला म्हणून मी त्यांच्यासोबत: रक्षा खडसे | LOKNews24

नवी दिल्ली प्रतिनिधी – डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर राहिलेला दिलीप राणा उर्फ द ग्रेट खली बाबा बनला आहे. त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. एका सोशल मीडिया पेजवर व्हिडीओ शेअर करण्यात केलाय. ज्यामध्ये खलीने आपल्या हातात बाळाला धरले आहे. खली बाबा झाल्याची माहिती पेजवरुन देण्यात आली आहे. यानंतर सोशल मीडियात त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एका सोशल मीडिया पेजवर खलीसोबत एक नवजात बालक आहे. खलीने आपल्या सोशल मीडिया पेजवर अद्याप याबद्दल माहिती दिली नाही. डब्ल्यूडब्ल्यूईमुळे घराघरात पोहोचलेल्या खलीचा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. लवकरच बरा होशील, असा खलीचा आवाज या व्हिडीओतून ऐकू येत आहे.द ग्रेट खलीला याआधी एक मुलगी आहे. खलीची पत्नी हरपिंदर कौरने अमेरिकी प्रसूती गृहात एका मुलीला जन्म दिला होता. खली हा सिरमौर जिल्ह्याया शिलाईतील धिराणा गावचा रहिवाशी आहे. सध्या खलीच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. रेसलिंग सोबतच खलीने बॉलिवूड सिनेमा आणि रिअलिटी शोमध्ये आपले टॅलेंट दाखवले आहे.

COMMENTS