Homeताज्या बातम्यामनोरंजन

मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी 

नाशिक: एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत,  राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'सापळा' हा आगामी मराठी चित्रपट 19 जानेवा

मुंबईत तब्बल 6 हजार 347 नवे कोरोना रुग्ण l DAINIK LOKMNTHAN
रझा अकादमीवर कायमची बंदी घालण्यासाठी शिफारस करा – आ. अतुल भातखळकर
औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळवण मार्फत स्वच्छता अभियान संपन्न

नाशिक: एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत,  राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘सापळा’ हा आगामी मराठी चित्रपट 19 जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्याचे अधिकृत टीझर नुकताच प्रकाशित करण्यात आला. या टीझरची झलक चित्रपटाचा पोत स्पष्ट करते. ही एक  खिळवून ठेवणारी आणि तेवढीच उत्कंठा वाढवणारी कथा आहे, हे यातून पुढे येते. “रक्ताचा वास येतोय,” असा संवाद यातील एका महिला पत्राच्या तोंडी आहे. दुसऱ्या एका दृश्यात दोन पुरुष पात्रे एका दूरच्या ठिकाणच्या एका खुनाचा संदर्भ देतात. त्यातून ही एक ‘मर्डर मिस्ट्री’ असावी का, अशी शंका पाहणाऱ्याच्या मनात येते. हा टीझर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवतो.चित्रपटाचे पोस्टर दोन आठवड्यांपूर्वी एका शानदार समारंभात प्रकाशित करण्यात आले. त्याला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे रसिकांबरोबरच चित्रपटसृष्टीतही या चित्रपटाबद्दल उत्कंठा लागून राहिली आहे. हा एक अभूतपूर्व असा मराठी थ्रिलर असणार आहे, अशी प्रतिक्रिया चित्रपटसृष्टीत आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी यांच्या भूमिका आहेत.  निखिल लांजेकर दिग्दर्शित ‘सापळा’ची कथा पटकथा संवाद-  श्रीनिवास भणगे यांचे आहेत.  चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे.या टीझरबद्दल बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, “सापाळाचा हा टीझर आमच्या चित्रपटाची एक झलक देवून जातो. अधिक काही सांगण्यापेक्षा प्रेक्षक हा टीझर आणि पुढे येणारे ट्रेलर पाहून आपसूक चित्रपटगृहाकडे वळतील अशी आमची खात्री आहे.”.चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना लांजेकर म्हणाले, “मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. अशाप्रकारच्या कथा या प्रेक्षकांना  नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्री श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही.प्रस्तुतकर्ते श्री संजय छाब्रिया म्हणाले, “एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट ही दर्जेदार निर्मिती आणि चांगल्या कथांसाठी ओळखली जावी यासाठी आम्ही नेहमी आग्रही असतो. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ हा एक स्वतंत्र निर्मिती स्टुडीओ असून त्यांनी गेल्या एका दशकात २३ चित्रपटांची निर्मिती, प्रस्तुती केली आहे. उच्च निर्मितीमुल्ये आणि दर्जेदार कथा यांमुळे त्यांच्या चित्रपटांना बाजारमुल्य मोठे आहे. अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी दिले आहेत. मुंबई-पुणे-मुंबई, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हॅप्पी जर्नी, तुकाराम,आम्ही दोघी,अनन्या, महाराष्ट्र शाहीर’, हे त्यांतील काही चित्रपट आहेत.

COMMENTS