नागपूर ः जिप्सींच्या गराड्यात ‘टी-114’ या वाघिणीची कोंडी झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रशासनाने आता नोंदणीकृत असलेल्या

नागपूर ः जिप्सींच्या गराड्यात ‘टी-114’ या वाघिणीची कोंडी झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रशासनाने आता नोंदणीकृत असलेल्या सर्व जिप्सींमध्ये जीपीएस अलर्ट सिस्टिम लावण्याचे ठरवले आहे. जूनमध्ये काही जिप्सींमध्ये याचे परीक्षण केले जाणार असून जुलैमध्ये बफरमध्ये जीपीएस अलर्ट सिस्टिम सुरू करण्यात येईल अशी माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी दिली. रिअल टाईम अलर्टची कोणतीही यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. हे लक्षात घेता जीपीएस अलर्ट सिस्टिम लावण्यात येणार आहे.
COMMENTS