Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे

सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रत

लाचप्रकरणी कॉन्स्टेबल पोलीस कोठडीत
फलटण-लोणंद लोहमार्गावरील रेल्वेसेवा आजपासून पुन्हा सुरु
माळशिरस रस्त्यावर मोटारसायकलच्या धडकेत दोन तरूणांचा जागीच मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगड घ्या संवर्धनासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी 13 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दुर्ग रायेश्‍वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभ पार, ता. महाबळेश्‍वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. महेश लांडगे, आ. नितेश राणे, संभाजी भिडे, उद्योजक भावेश भाटिया, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रायेश्‍वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याने या मंदिराला वेगळे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमित आपण जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. त्यांचा दैदिप्यमान वारसा तरुण पिढीला कळावा यादृष्टीने अशा गडकोट मोहीमा महत्वाच्या आहेत, असे सांगून त्यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन याला केंद्र आणि राज्य शासनाने प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी प्रदीप बाफना यांनी मनोगत व्यक्त केले. रावसाहेब देसाई यांनी प्रास्ताविक केले. संजय जठार यांनी आभार मानले. मोहिमेमध्ये सहभागी करून पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS