Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर मुलीला पळविले

मुंबई : इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. या आरोपीला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने बेड्या ठ

लग्न अटपून परतणाऱ्या गाडीचा अपघात, १५ जण जखमी | LokNews24
औरंगाबाद शहरातील मेल्ट्रॉन हॉस्पिटल मध्ये घेण्यात आला मॉकडिल
डॉ. कुमार सप्तर्षी यांना मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना पुरस्कार प्रदान

मुंबई : इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. या आरोपीला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. रवींद्र रातंबे असे आरोपीचे नाव आहे. अवघ्या 48 तासात या मुलीचा शोध घेत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. संबंधित अल्पवयीन मुलगी सोलापूर ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान कुटुंबासह प्रवास करत होती. याच दरम्यान अचानक मुलगी गायब झाली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने या मुलीचा शोध सुरू केला होता.

COMMENTS