Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हे यांनी जखमी युवकाला केली मदत

स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात केले दाखल

कोपरगाव तालुका ः  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी माणुसकी धर्म जपत एका अपघातग्रस्त जखमी य

 राष्ट्रीय सहकार धोरण आणि सरकारमुळे विकास प्रक्रियेत अधिक गतिमानता ः विवेक कोल्हे
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सर्वांनी पाहावा ः विवेक कोल्हे
तुमच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलो ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः  सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी माणुसकी धर्म जपत एका अपघातग्रस्त जखमी युवकास तातडीने स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवले. विवेक कोल्हे हे अक्षरशः देवदूतासारखे त्या जखमी तरुणाच्या मदतीला धावून आल्याने त्याला जीवदान मिळाले. या घटनेतून विवेक कोल्हे यांनी संकटात सापडलेल्या माणसाला मदत करून माणुसकीचे दर्शन तर घडवलेच; पण लोकप्रतिनिधींनी कसे वागावे याचे आदर्श उदाहरण समाजासमोर उभे केले आहे.
युवा नेते विवेक कोल्हे बुधवारी (13 डिसेंबर) रात्री आपल्या गाडीतून जात होते. त्यावेळी कोपरगाव तालुक्यातील धामोरी फाटा येथील साईबाबा मंदिरासमोर एक तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतः गाडीतून उतरून त्या तरुणाकडे धाव घेतली. सदर तरुण मदतीच्या प्रतीक्षेत बराच वेळापासून रस्त्यावर पडलेला होता. या रस्त्यावरून अनेक वाहने जात होती; परंतु कोणीही त्या तरुणाच्या मदतीसाठी थांबत नव्हते. अशा वेळी विवेक कोल्हे यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेला पाचारण केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब आपल्या गाडीतून त्या जखमी तरुणाला उपचारासाठी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सदर जखमी युवकाला विवेक कोल्हे यांनी तात्काळ स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर विवेक कोल्हे यांनी स्वतः चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्या जखमी युवकाची भेट घेऊन त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.

COMMENTS