किनवट प्रतिनिधी - निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने 8 एप्रिल शनिवार रोजी कापेश्वर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेम
किनवट प्रतिनिधी – निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने 8 एप्रिल शनिवार रोजी कापेश्वर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता भास्करराव पंडागळे , क्रांतीताई धोटे ( राऊत ) , ज्येष्ठ पत्रकार पद्माकर भाऊ मलकापूरे ही प्रमुख मान्यवर मंडळी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होती. यावेळी अनेक व्यक्तींनी आपल्या भाषणातून या प्रकल्पावर प्रकाश टाकला तर या प्रकल्पाचे सेवानिवृत्त झालेले कार्यकारी अभियंता भास्करराव पंडागळे यांनी निम्न पैनगंगा प्रकल्प कसा ओडून ताडून शासनाने रेशो मध्ये बसविला याबाबतची मुद्देसूद माहिती उपस्थितांपुढे मांडली, हा प्रकल्प जनतेच्या हिताचा नसून तो अधिकारी व ठेकेदार यांच्या हिताचा असल्याचे त्यांनी पुराव्यासह मुद्दे भाषणातून मांडले.
निम्न पैनगंगा प्रकल्प हा केवळ शासनाच्या पैशाची लूट करण्याच्या उद्देशाने अधिकारी व ठेकेदारांनी बनवलेलं बोगस धरणाचे मॉडेल असल्याचे आपल्या भाषणातून भास्करराव पंडागळे यांनी ठासून सांगितले तर क्रांतीताई धोटे ( राऊत )यांनी या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यास ते रोखण्यासाठी बुडीत क्षेत्रातील महिला पेक्षा मी आघाडीवर राहील तसेच हा प्रकल्प रोखण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते मी निश्रि्चत माझ्या सर्वतोपरीने करेलच असे उपस्थितांना भाषणातून आश्वासित केले. तर ज्येष्ठ पत्रकार पद्माकर मलकापूरे यांनी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती गेल्या 25 वर्षापासून मुद्दे निहाय , कायद्याच्या चाकोरीत राहून लढत असलेल्या धरणविरोधी संघर्षाचा आपल्या भाषणातून कौतुक केले. यावेळी धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप, मुबारक तंवर, बंडूसिंग नाईक, ज्योतिबादादा खराटे , समाधान जाधव , अर्जुन आडे , शंकर सिडाम , डॉ. बाबा डाखोरे, नामदेवराव केशवे, प्रकाश गायकवाड, डॉ. सुप्रिया गावंडे ,प्रल्हाद गावंडे,विजय पाटील राऊत,ऍड. बालाजी येरावार, मिलिंद पाटील शिंदे, उत्तम पैकीने इत्यादींनी आपले धरणविरोधी विचार प्रखरपणे मांडले, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊच द्यायचा नाही असाच सुर आजच्या सभेतून उमटला. आजच्या जाहीर सभेला पाच हजारांहून अधिक शेतकरी शेतमजूर ऊपस्थित होते. या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी रामकृष्णदादा पाटील राऊत हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मदनापूर येथील महिला भजनी मंडळाच्या भजनी गीताने झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक यवतमाळ जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष धरणविरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय समगीर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कापेश्वर येथील सरपंच, उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य तथा गावकर्यांनी अथक परिश्रम घेतले.
COMMENTS