कोपरगाव तालुका ः रयत शिक्षण संस्थेच्या वारी येथील श्री रामेश्वर विद्यालय येथे गोदावरी बायोरिफायणरीजच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटना साकरव
कोपरगाव तालुका ः रयत शिक्षण संस्थेच्या वारी येथील श्री रामेश्वर विद्यालय येथे गोदावरी बायोरिफायणरीजच्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटना साकरवाडी या कामगार संघटनेच्या वतीने पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना नुकतेच गोदावरी बायोरिफायणारीजचे डायरेक्टर सुहास गोडगे यांचे उपस्थितीत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
गेल्या सहा वर्षांपासून गोदावरी बायोरिफायणरीज कामगार संघटनेचे पदाधिकारी हे सचिन टेके यांचे नेतृत्वाखाली हा स्थुत्य असा उपक्रम राबवितात यावर्षी मात्र पाचवीच्या वर्गांतील कु. ईश्वरी अशोक कानडे, कु कविता नरेश टेके, कु. ईशा सुनिल महाले, कु. जान्हवी जयसिंग बनगैया, कु श्रेया रविंद्र टेके या काही चिमुकल्यानी पुढे येत आपल्या वाट्याला आलेला गणवेश इतर गरीब व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात यावा अशी विनंती केली त्यांच्या या कृतीने आम्हा शिक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला तसेच त्यांचे कौतुक व त्यांच्या दातृत्वाचा अभिमान वाटला असे शिक्षक कैलास शेळके यांनी सांगितले. या वेळी मनातून गहिवरुन आले या बाल मनावर इतक्या कमी वयात दात्तृत्वाचे संस्कार रुजले जाणे ही अभिमानास्पद बाब आहे समाजात एकीकडे स्वार्थाची परिसीमा गाठलेली असताना बालवयातील मुलींनी हा दातृत्वाचा संदेशच समाजाला दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या मनावर नक्कीच त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे, समाजातील दातृत्व जपणार्या सर्वांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार घडले असणार यात शंका नाही. विद्यार्थिनींनी व त्यांच्या निर्णयाला पाठींबा देणार्या पालकांनी मिळालेला गणवेश दुसर्या गरजु विद्यार्थिनींना दिला याबद्दल त्या विद्यार्थिनींचे व त्या विद्यार्थिनींच्या पालकांचे स्थानिक स्कुल कमिटी सदस्य अँड शरद जोशी, सुरेश जाधव, बद्रीनाथ जाधव नामदेवराव जाधव, नारायणराव वाळुंज, सचिन टेके, मुख्याध्यापक सुधाकर साळुंके, शिक्षक कैलास शेळके वर्गशिक्षक रासकर, तुपे, बर्डे, सुकटे, जाधव, जेठे यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS