Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेतून निवडल्या जाणार्‍या 188 सरपंचांचे भवितव्य मतपेटीत बंद

195 ग्रामपंचायतींसाठी 80 टक्क्यावर मतदान

अहमदनगर/प्रतिनिधी - जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी दिवसभर ग्रामीण भागात उत्साही मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. य

कोपरगावमध्ये पहाट पाडवा उत्साहात
देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास मंजुरी
महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे वाहनांना धक्का मारो आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी – जिल्ह्यातील 195 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी दिवसभर ग्रामीण भागात उत्साही मतदान झाले. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणुकीसाठी सुमारे 80 टक्क्यांच्यावर मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बहुचर्चित जनतेतून निवडल्या जाणार्‍या जिल्ह्यातील 188 सरपंचांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या मंगळवारी (20 डिसेंबर) सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.


2 लाख 25 हजार 301 महिला मतदार आणि 2 लाख 36 हजार 78 पुरुष मतदार अशा एकूण 4 लाख 61 हजार 381 मतदार सर्व 195 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत होते. दुपारी साडेतीन पर्यंत सुमारे 69 टक्के मतदान झाले होते व काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. सर्वत्र उत्साही वातावरण होते. मतदान यंत्रात कोठेही बिघाड झाल्याची वा कोठे काही अनुचित घटना घडली नसल्याचे प्रशासनाद्वारे सांगण्यात आले.


जिल्ह्यात मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत 8 ग्रामपंचायती आणि 15 सरपंच पदाच्या जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 195 ग्रामपंचायत आणि 188 सरपंच पदांच्या जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. रविवारी सकाळी जिल्ह्यातील 14 तालुक्यात सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दोन तासात म्हणजेच 11.30 पर्यंत 30.53 टक्के मतदान झाले होते. 76 हजार 955 पुरुष आणि 63 हजार 893 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतरच्या दोन तासात मतदानाची आकडेवारी ही 54.19 टक्क्यांवर पोहोचली. यावेळी 1 लाख 34 हजार 414 पुरुष आणि 1 लाख 15 हजार 595 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 3.30 पर्यंत मतदानाची आकडेवारी ही 69.42 टक्के झाली होती. यात 1 लाख 65 हजार 741 पुरुष आणि 1 लाख 54 हजार 559 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.


सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ असल्याने शेवटी शेवटी अनेक ठिकाणी गर्दी झाली होती. जिल्हा प्रशासनाद्वारे मतदानाची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू होते. मात्र, अंदाजे 80 टक्क्याच्यावर मतदान झाले असावे, अशी शक्यता वर्तवली गेली. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मतमोजणी उद्या मंगळवारी (20 डिसेंबर) होणार असून, यावेळी कोणी बाजी मारली, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

COMMENTS