जिंतूर - छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या वनरक्षक भरतीसाठी जिंतूर तालुक्यातील मौजे अकोली येथील दोन भाऊ आपल्या सर्वात लहान बहिणीला वनरक्षक भ
जिंतूर – छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या वनरक्षक भरतीसाठी जिंतूर तालुक्यातील मौजे अकोली येथील दोन भाऊ आपल्या सर्वात लहान बहिणीला वनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणी वरुन परत येत असताना संभाजीनगर येथील बीड बायपास येथे गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भरदार ट्रक मोटरसायकल चा अपघात होऊन यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक अशी की, जिंतूर तालुक्यातील मौजे अकोली येथे राहणारे तीन भाऊ व एक बहीण असलेले मध्यमवर्गीय कुटुंब यापैकी सर्वात मोठा भाऊ मेकानिक असून या आपघाता मध्ये मयत प्रवीण भगवान अंभोरे(वय२४) हा संभाजीनगर येथे खाजगी दुकान वर कामावर निमित्त होता तर मयत प्रदीप भगवान अंभोरे(२२) हा बहीण मयत प्रतीक्षा भगवान अंभोरे(वय२०) सोबत बुधवार रोजी मोटरसायकल क्र .(MH22 B3229) वर गेले संभाजीनगर येथे गेले आपल्या मोठ्या भावाकडे रात्री मुक्कामी राहिले व सकाळी मैदानी चाचणीसाठी बोलावले असल्याने सकाळी प्रवीण प्रतिक्षा प्रदीप हे तिघेजण गेले सकाळी लवकर मैदानी चाचणी झाल्याने परत घराकडे येत असताना बीड बायपास महामार्ग येथे भरधाव ट्रकने समोरा समोर तीनही बहीण भावांना चिरडले या दुर्दैवी घटनेमध्ये या तिघांचाही जागीच मृत्यू झाला यामध्ये सर्वात लहान असलेला प्रदीप हा अगदी कमी वयामध्ये अकोली ग्रामपंचायत चा सदस्य आहे. तर बहीण प्रतीक्षा हिचे प्राथमिक शिक्षण अकोली येथे झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जिंतूर येथील ज्ञानेश्वरी महाविद्यालय येथे झाले आहे. तिला वनरक्षक परिक्षेच्या लेखी चाचणी मध्ये ८४ गुण मिळाले होते त्यामुळे गुरुवारी सकाळी सहा वाजता तीची मैदानी चाचणी झाली त्यामध्येही प्रतिक्षाला चांगले गुण मिळाले आहेत त्यामुळे ती गुणवत्ता यादीमध्येही उद्या येऊ शकते परंतु काळाला ही गोष्ट मान्य नव्हती आणि या तीनही बहीण भावंडांचा आनंद काळाने एका क्षणात हिरावून घेतला या घटनेमुळे सर्वत्र व्यक्त होत आहे तर अकोली गावावर शोककळा कळा पसरली आहे. सदरील घटनेतील तीन ही जणांना संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात दाखल करुन शवविच्छेदन करण्यात आले.
वडिलांचे स्वप्न अपूर्ण राहिले..! – तीन भाऊ एक बहीण असलेले हे मध्यमवर्गीय कुटुंब यामध्ये प्रतीक्षाही वडिलांची सर्वात लाडकी मुलगी होती एक मुलगी असल्याने तिला चांगल्या ठिकाणी देण्यासाठी वडीलाचे प्रयत्न होते परंतु तिला उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले तर प्रतीक्षाही जिद्दी चिकाटी असल्याने ग्रामीण भागातील या मुलीला कुठल्याही प्रकारे मैदानी चाचणीसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसतानाही तिच्या स्व बळावर तिने या भरतीचा मैदानी सराव केला. तिने पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी केली त्यामुळे आपली मुलगी ही पोलीस किंवा इतर शासकीय नोकरीमध्ये नक्कीच यश मिळेल हे वडिलांचे स्वप्न नेहमीच असायचे त्यामुळे आता तोंडाशी आलेली संधी काळाने हिरावली मोठा दुःखाचा डोंगर या कुटुंबावर ओढावला आहे.
COMMENTS