Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंडिया आघाडीची दारे आमच्यासाठी तूर्त बंद ः अ‍ॅड. आंबेडकर

पुणे ः वंचित बहुजन आघाडीसाठी सध्यातरी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची कवाडे बंद आहेत. आम्हाला आघाडीत केव्हा प्रवेश द्यायचा हे आता त्यांनीच ठरवाय

वणीच्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेत घोटाळ्याचा आरोप
थोरात कारखान्याकडून हुमणी अळी नियंत्रण अभियान
टीईटीसह पोलीस भरतीचे पेपर ही संशयाच्या भोवर्‍यात | DAINIK LOKMNTHAN

पुणे ः वंचित बहुजन आघाडीसाठी सध्यातरी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची कवाडे बंद आहेत. आम्हाला आघाडीत केव्हा प्रवेश द्यायचा हे आता त्यांनीच ठरवायचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी 206 व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वंचितचा लवकरच विरोधकांच्या इंडिया आघाडीत प्रवेश होण्याचे संकेत दिले.
इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही भाष्य केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळे केव्हा ना केव्हा औपचारिक अनौपचारिक भेटीगाठी होतच राहणार. त्यामुळे याविषयी वेगवेगळे अर्थ काढण्याची काहीच गरज नाही. वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत केव्हा घ्यायचे हे आता त्यांनी ठरवायचे आहे. पण सध्या तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीची दारे बंदच आहेत. आम्हाला इंडिया आघाडीत घेण्यास कुणाचा विरोध आहे हे माहिती नाही. पण ज्या दिवशी आमचा इंडिया आघाडीत समावेश होईल, त्या दिवशी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत 10 वर्षांत कसे पोकळ केले याचा आराखडा मांडू असे प्रकाश आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले. नव्या वर्षात सत्तेत येणे, संविधान वाचवणे व शांतता अबाधित ठेवणे हा आमचा संकल्प आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. उल्लेखनीय बाब म्हणजे दरवर्षी लाखो लोक कोरेगाव भीमा युद्धाच्या वर्धापन दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करतात. हे युद्ध 1 जानेवारी 1818 रोजी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांमध्ये झाले होते.

COMMENTS