नवी दिल्ली ः श्री बद्रीविशाल लाल की जयच्या घोषणांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी 20 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. याआधी ब्रह्म

नवी दिल्ली ः श्री बद्रीविशाल लाल की जयच्या घोषणांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी 20 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. याआधी ब्रह्ममुहूर्तावर मंदिराबाहेर गणेशपूजा केली गेली. यानंतर पुजार्यांनी द्वारपूजन केले. मंदिराचा दरवाजा तीन चावीने उघडला गेला. दरवाजे उघडताच प्रथम दर्शन अखंड ज्योतीचे होते. 6 महिन्यांपासून ती प्रज्वलित आहे. यानंतर बद्रीनाथवर ठेवलेली तुपाची चादर काढून टाकण्यात आली. जी 6 महिन्यांपूर्वी दरवाजे बंद करताना देवाला अर्पण केली जाते. ही चादर प्रसाद म्हणून वाटली जाणार आहे. गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
COMMENTS