Homeताज्या बातम्या

पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयही होणार रद्द

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी घेतलेले दोन निर्णय रद्द होणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणार्‍या गणवेशाचा निर्णय रद्द करून आता शाल

दुकान फोडून 1 लाख 90 हजार रोख रकमेसह आठ एलईडी टीव्ही लंपास l पहा LokNews24
मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? l LokNews24
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार : अजित पवार

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी घेतलेले दोन निर्णय रद्द होणार आहे. राज्य सरकारकडून देण्यात येणार्‍या गणवेशाचा निर्णय रद्द करून आता शालेय व्यवस्थापन समितीच शालेय पातळीवर गणवेश पुरवणार आहे, त्यामुळे केसरकरांना धक्का बसलेला असतांनाच आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय देखील रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतच आपल्या मंत्र्यांचेच निर्णय रद्द करण्याची स्पर्धा लागल्याची चर्चा सुरू आहे.
शालेय शिक्षणमंत्रीपदाचा कार्यभार दादा भुसे यांनी घेतल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती आहे. पुस्तकाला वह्याचीपाने जोडणार्‍या निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एक राज्य एक गणवेश या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णयावर सुद्धा फेरविचार सुरू झाला आहे.

शालेय शिक्षणमंत्री थेट वर्गातील बेंचवर
शिक्षण खात्याचा पदभार मिळताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोहोचले आहेत. वर्गातील बेंचवर बसून मुलांकडून त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेतील कवितांचे वाचनही करून घेतले. शिक्षकांच्या शाळेतील दप्तरांचीही तपासणी केली, मालेगाव तालुक्यातील देवरपाडे येथील ग्रामीण भागातील शाळांना दादा भुसे यांनी अचानक भेटी दिल्याचं पाहायला मिळालं. शालेय शिक्षण, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार आदी अडचणी समजून घेतल्या.

COMMENTS