श्रीगोंदा प्रतिनिधी ःश्रीगोंदा पंचायत समिती येथे पाण्याची टाकी प्राथमिक शाळा आणि मंदिरा शेजारी बांधू नये यासाठी घोडेगाव ग्रामस्थ आणि काही ग्रामपं
श्रीगोंदा प्रतिनिधी ःश्रीगोंदा पंचायत समिती येथे पाण्याची टाकी प्राथमिक शाळा आणि मंदिरा शेजारी बांधू नये यासाठी घोडेगाव ग्रामस्थ आणि काही ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवार 17 एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी अधिकार्यांना या विषयाबद्दल विचारणा करून काही सूचना केल्या. विस्तार अधिकारी बनकरसाहेब यांनी घोडेगाव ग्रामविकास अधिकार्यांना ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या तसे ग्रामस्थांना लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
घोडेगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी साठी प्राथमिक शाळे शेजारी व मंदिर परिसरात या टाकीचे काम सुरू केले होते गावातील प्राथमिक शाळेभोवती मुलांची व मंदिराशेजारी ग्रामस्थांची रहदारी असते इथे जर पाण्याची टाकी बांधली तर रहदारीस अडचण निर्माण होईल व गावातील मध्यवर्ती भागात लग्नकार्य व धार्मिक विधी साठी पटांगण राहनार नाही त्यामुळे येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करू नये या साठी घोडेगाव ग्रामस्थ व काही ग्रामपंचायत सदस्य यांनी श्रीगोंदा पंचायत समिती येथे उपोषण सुरू केले होते. याबाबत विस्तार अधिकारी बनकरसाहेब यांनी लेखी पत्राद्वारे दि.25 एप्रिल 2023 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करुन जल जीवण मिशन योजने अंतर्गत पाण्याच्या टाकीच्या जागेबाबत सदर निवेदनामधील मागणीसंदर्भात आवश्यक व नियमानुसार कार्यवाहीसाठी आपल्या स्तरावरुन ग्रामसभेच्या नियमावलीनुसार योग्य निर्णय घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही आपल्या स्तरावरुन करावी व तसा अहवाल या व संबधीत निवेदनकर्त्यांस सादर करावा. तसेच संबधीत उपोषणकर्त्यांना सोमवारपासून सुरू केलेल्या उपोषणापासून परावृत करावे. आशा आशयाचे पत्र मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष घनश्याम शेलार, विस्तार अधिकारी बनकरसाहेब, उपअभियंता जलजीवन मिशन कांगुणेसाहेब, ग्रामविकास अधिकारी डोमे मॅडम, शिवसेनेचे नंदकुमार ताडे, ठकाराम मचे, रुपचंद दरेकर, संजय मचे, ज्ञानदेव वाघमारे, सचिन फटे, अजीज शेख, संतोष फटे, यशवंत मचे, पंकज मचे, सुरेश माळी, दादा वाजे, रखमाबाई मोरे, लताबाई मचे, ललिता मचे, सत्यभामा मचे, रोहिदास मचे, जनार्धन गिरमकर, राजाराम फटे, आबा वाजे, विशाल मचे, समीर शिंदे, जयेश देवकर, बाळासाहेब मचे, संजय पवार, शुभम वाघमारे, अभिजित मचे, रामदास मचे, समीर मचे, वैभव कोकाटे, दादा सुपेकर, आशिष वाजे, सुनील शिंदे, सचिन वाजे, गणेश मोटे, नितीन वाघमारे, महेश मचे, शहाजी मचे, नागेश मचे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS