Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देहदानाचा निर्णय समाजास दिशादर्शक राहील

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा वंचितचे उपाध्यक्ष गणेश कारंडे यांनी आपल्या 55 व्या वाढदिनी देहदानाचा निर्णय घेतला. त्यामुळेच खरा-खुरा अभिष्टचिंतन सोह

पावसाने ओढ दिल्यास विज निर्मितीसाठीचे पाणी पिण्यासह सिंचनास देण्याचा विचार : ना. शंभूराज देसाई
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राजीनामा द्यावा : शाकीर तांबोळी
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा वंचितचे उपाध्यक्ष गणेश कारंडे यांनी आपल्या 55 व्या वाढदिनी देहदानाचा निर्णय घेतला. त्यामुळेच खरा-खुरा अभिष्टचिंतन सोहळा समाजास दिशादर्शक राहील.
येथील शहरात ठिकठिकाणी गणेश कारंडे यांचे अभिष्टचिंतनाचे कार्यक्रम विविध उपक्रमाने साजरे करण्यात आले. मात्र, त्यांच्या घरचा व देहदानाचा निर्णय यामुळे अधिकचा अभिष्टचिंतन सोहळा रंगला. याबाबत कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टकडे त्यांनी देहदानाचा अर्ज सुपूर्द केला आहे. यावेळी वंचितचे पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, विद्वतचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ बिराजे, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, अनिल वीर, वामन गंगावणे, बी. एल. माने, शामराव बनसोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS