खेड तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली . दोघा शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर तिसरा मुलगा दैवं बलवत्तर म्हणून अगदी थोडक्यात बुडताना
खेड तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली . दोघा शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर तिसरा मुलगा दैवं बलवत्तर म्हणून अगदी थोडक्यात बुडताना वाचलाय. सार्थक ढोरे आणि शिवम गोपाळे अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. या मुलांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेला दोन मुलांपैकी सार्थक हा आपल्या मामाच्या गावी दिवाळीची सुट्टी लागली म्हणून आला होता. सार्थकच्या मृत्यूने त्याच्या आईवडिलांना मोठा धक्काच बसलाय. या मुलांच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

COMMENTS