पुण्यात पाणी पट्टीचा खर्च १२० कोटींनी वाढणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पाणी पट्टीचा खर्च १२० कोटींनी वाढणार

पुणे: पुणे शहराच्या मागणीनुसार वाढीव पाणी कोटा अद्याप राज्य शासनाने मंजूर केला नाही.पण पाटबंधारे विभागाकडून पाण्याची पट्टी मात्र वाढवली जात आहे. त्या

संगमनेरात एसटी संपाला हिंसक वळण ; अज्ञाताकडून एसटीवर दगडफेक; एक महिला जखमी
वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू निवृत्त
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीस प्रतिबंधसाठी तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना

पुणे: पुणे शहराच्या मागणीनुसार वाढीव पाणी कोटा अद्याप राज्य शासनाने मंजूर केला नाही.
पण पाटबंधारे विभागाकडून पाण्याची पट्टी मात्र वाढवली जात आहे. त्यामुळे आता महापालिकेला या पाणीपट्टीसाठी वर्षाकाठी ८० कोटी रुपयांऐवजी तब्बल २०० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. थोडक्यात काय तर हा १२० कोटी रुपयांनी वाढलेला खर्च पुणेकरांच्या करातूनच वसूल केला जाणार आहे. शहराला खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव, भामा आसखेड या धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाने महापालिकेसोबत केलेल्या करारानुसार ११.५० टीएमसी पाणी कोटा शहरासाठी मंजूर केला आहे. त्यासाठी प्रतिवर्षी महापालिकेला ७५ ते ८० कोटी रुपये पाटबंधारे विभागाला द्यावे लागतात. पाटबंधारे विभागाने आता नवे दर लागू केले आहेत. १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

COMMENTS