Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो छावाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार- करण गायकर

नाशिक - छावा क्रांतिवीर सेनेच्या शिर्डी येथे होणाऱ्या दहाव्या राष्ट्रीय महा अधिवेशनाच्या पूर्वतयारीची नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक संस्थापक अध्

स्वराज्य पक्षाच्या वतीने कांद्याची माळ घालून दिले निवेदन – करण गायकर  
कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ केंद्र व राज्य सरकारने उठवावी अन्यथा शेतकऱ्याच्या रोशाला सामोरे जाण्याची ताकद ठेवावी- करण गायकर 
स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर – करण गायकर  

नाशिक – छावा क्रांतिवीर सेनेच्या शिर्डी येथे होणाऱ्या दहाव्या राष्ट्रीय महा अधिवेशनाच्या पूर्वतयारीची नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकचे ग्रामदैवत कालिका मंदिर येथील कॉन्फरन्स हॉल नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न. शिर्डी येथे २७ जुलै रोजी साई सम्राट लॉन्स या ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा नरेंद्र अण्णासाहेब पाटील,मुंबई मित्र समूह वृत्तपत्र संपादक अभिजीत राणे जन स्वराज्य सेना पक्षाचे संस्थापक सुरेश नाना पवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार आशुतोष काळे खासदार कल्याण काळे माजी खासदार सुजय विखे पाटील यांसह सर्व पक्षांचे आमदार खासदार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्वपक्षीय जिल्हाप्रमुख महानगर प्रमुम पाहुण्यांच्या उपस्थित अधिवेशन पार पडणार आहे.

या अधिवेशन नियोजन बैठकीला छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे,प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे,युवक प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग,केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे,प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे,शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज जराड पाटील,युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोखे,प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर,नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे,ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघ,आयटी विभाग राज्य संपर्कप्रमुख वैभव दळवी,महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई सूर्यवंशी,कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश नरवडे,जालना जिल्हाप्रमुख राम गाडेकर पाटील,नाशिक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे,सांस्कृतिक व पर्यटन विभाग जिल्हाप्रमुख भारत पिंगळे,युवक जिल्हाप्रमुख गिरीश आहेर,शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख नारायण बाबा जाधव,कामगार आघाडी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कोटकर,आदिवासी आघाडी जिल्हाप्रमुख हरीश कुंदे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सविता वाघ,उद्योजक आघाडी जिल्हाप्रमुख दादासाहेब जोगदंड,आयटी विभाग नाशिक जिल्हाप्रमुख शुभम देशमुख,उपजिल्हाप्रमुख करण शिंदे,युवक उपजिल्हाप्रमुख सागर माळोदे,शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर पालखेडे,कामगार आघाडी उपजिल्हाप्रमुख रवी धोंगडे,इगतपुरी तालुकाप्रमुख गोकुळ धोंगडे,येवला तालुकाप्रमुख प्रफुल गायकवाड,जिल्हा संघटक किरण लवंड,कळवण तालुका संपर्कप्रमुख स्वप्निल आहेर,युवक जिल्हा संघटक राहुल काकळीज,नाशिक तालुकाप्रमुख सचिन जाधव,शहर कार्याध्यक्ष शुभम महाले,युवक जिल्हा सरचिटणीस प्रशांत सूर्यवंशी,रायगड जिल्हा सरचिटणीस निलेश जामकर.

आधी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दहाव्या राष्ट्रीय महा अधिवेशनाची बैठक संपन्न झाली यावेळी नाशिक जिल्ह्यामधून शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाला प्रत्येक विभागातून तालुक्यातून होल्डिंग वॉल पेंटिंग स्टिकर त्याचबरोबर अधिवेशनाला कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठी गाड्यांचे नियोजन याबाबत सविस्तर सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली तसेच अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांचे नेण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. 

यावेळी मिटींगला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संघटनेचे अधिवेशन हे आपल्यासाठी एक गौरवाची गोष्ट असते वर्षभर संघटनेने ज्या पद्धतीने विविध विषयांवर आंदोलने मोर्चे छोटे खानी मिळावे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जे काम केलेले असते त्या कामाचा एक गौरव अधिवेशनात होत असतो. त्याचबरोबर पुढील वर्षभर कुठल्या विषयावर आंदोलन करायचे अधिवेशनात प्रामुख्याने कुठले विषय असले पाहिजे याबाबत आपण नियोजन करून पुढील दिशा ठरवत असतो अधिवेशनाच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना एक नवीन ऊर्जा मिळत असते त्या ऊर्जेतून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला एक ताकद मिळत असते.आणि तीच मिळविण्यासाठी आपण सर्वांनी या अधिवेशनाला एक वेगळं गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आजपासून तयारीला लागायचे आहे.

यावेळी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही मनोगत व्यक्त करताना हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व तन-मन-धनाने प्रयत्न करू अधिवेशनात आज ज्या ज्या जबाबदाऱ्या आम्हाला दिलेले आहेत त्या यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास यावेळी त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना दिला.

या कार्यक्रमाचे आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत प्रास्ताविक जिल्हाप्रमुख आशिष हिरे व ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ यांनी केले तर आभार महानगरप्रमुख योगेश गांगुर्डे यांनी मानले.

यावेळी बैठकीला नितीन आतकर,जयेश मोरे,सखाराम गव्हाणे,अश्विन पांडे,विकास धोंगडे,आकाश गायकर,गणेश भोर,गणेश गव्हाणे,विलास पवार,गणेश ठाकरे,रोहिदास पवार,गणेश वैराळ,सुनील ठाकरे,योगेश जाधव,महिला आघाडी जिल्हा संघटक वैशालीताई काळे,जिल्हा कार्याध्यक्ष रूपाली ताई काकडे,उपजिल्हाप्रमुख दिपाली ताई लोखंडे,दामिनी सूर्यवंशी,आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी मिटींगला उपस्थित होते.

COMMENTS