Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप-शिंदे गटातील संघर्ष शिगेला

मंत्री चंद्रकांत पाटलांचा स्वबळाचा नारा

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश असला आणि राज्यातील सत्ता-संघर्षाचा अजून फैसला होण्यास अवधी असला तरी, राज्यात श

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीचे छापे
टेम्पोत फिरवून आणतो म्हणत अल्पवयीन मुलीवर बलात्कार | LOKNews24
महसूल ची कार्यवाही बळेगाव येथील चार वाळू तस्कंराविरुद्धात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून अवकाश असला आणि राज्यातील सत्ता-संघर्षाचा अजून फैसला होण्यास अवधी असला तरी, राज्यात शिंदे गट आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून चांगलाच संघर्ष होतांना दिसून येत आहे. त्याला निमित्त ठरले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हिडिओ. आम्ही 240 जागा लढवणार असून शिंदे गटाला 48 जागा देण्यात येणार असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले होते. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या स्वबळाचा नारा दिला आहे.
पुण्यात एका कार्यक्रमात बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजप हा एक निवडणूक झाल्यावर पुढील निवडणुकीची तयारी करत असतो. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, एक निवडणूक पार पडली की दुसर्‍या निवडणुकीच्या तयारीला भाजप लागत असते. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांची तयारी केली आहे. लोकसभेच्या संपूर्ण 48 आणि विधानसभेच्या 288 जागा भाजप स्वबळावर लढवणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे. शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येतील, हे आताच ठरवण्याचं कारण नाही. त्यांना आमचीच तयारी उपयोगी पडणार असल्याचे सांगत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणला आहे.

50 जागा घ्यायला आम्ही मूर्ख आहोत का? शिंदे गट –जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल. भाजपच्या नेत्यांनी त्यापूर्वीच वक्तव्य करून नवा वाद पेटवू नये. विधानसभा निवडणुकीत फक्त 50 जागा घ्यायला आम्ही मूर्ख नाही, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे जागावाटपात शिंदे गटाला 140 जागा देण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

COMMENTS