मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने सर्वाधिक जागा जिंकत सत्तेवर आले होते. या सरकारने सोमवारी विश्वासदर्शक ठराव आवाजी मता

मुंबई : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने सर्वाधिक जागा जिंकत सत्तेवर आले होते. या सरकारने सोमवारी विश्वासदर्शक ठराव आवाजी मताने मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला असून तो आवाजी मताने मंजूर करण्यात आला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, त्यामुळे या ठरावावर कोणताच विरोध होण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे उदय सामंत यांनी मांडलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर अनिल पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर नार्वेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर विधानसभेच्या प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीवर बसवल्यानंतर कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी अभिनंदन प्रस्तावावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी सभागृहातचा चेहरा बदलला. नार्वेकर यांनी तरुण वयात अध्यक्षपद भूषवले आहे. नार्वेकर यांचे दालन सर्वांसाठी कायम खुले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ते पुढील काळातही सर्वांसाठी खुले राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी गेली अडीच वर्षे न्यायाधिशाचे काम केले. त्यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी जे मुद्दे मांडेल, त्या सर्व मुद्यांवर विचार करण्याची आमची तयारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. अनेक नवीन सदस्यांना जास्त बोलण्याची संधी मिळत नाही. मात्र, तरी देखील जास्तीत जास्त संधी कशी दिली जाईल, याची काळजी घेणार असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
COMMENTS