समाजवादी पक्षाचा गड कोसळला; मुलायमसिंह यादव यांचे निधन

Homeताज्या बातम्यादेश

समाजवादी पक्षाचा गड कोसळला; मुलायमसिंह यादव यांचे निधन

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि तब्बल 55 वर्ष राजकारणात सक्रिय असणार्‍या मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 82 व

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
पुण्यातून वसंत मोरे लढणार लोकसभा
महाबळेश्‍वर तालुक्यात मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीच्या शेतात पाणी साचले

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि तब्बल 55 वर्ष राजकारणात सक्रिय असणार्‍या मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 82 वर्षांचे होते. युरिन इन्फेक्शनमुळे 26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम यांच्या निधनाची माहिती दिली. मुलायम यांचे पार्थिव सैफई येथे नेण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मेदांता हॉस्पीटलच्या यांच्या जनसंपर्क अधिकार्‍याने सांगितले की, मुलायम सिंह यांना किडनीच्या संसर्गासोबत रक्तदाबाचा त्रास वाढला होता. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर हलवले होते. 22 नोव्हेंबर 1939 रोजी सैफई येथे जन्म झालेल्या मुलायमसिंह यादव यांचे शिक्षण इटावा, फतेहाबाद आणि आग्रा येथे झाले. मुलायम काही दिवस मैनपुरीतील करहल येथील जैन इंटर कॉलेजमध्येही प्राध्यापक होते. पाच भावंडांपैकी दुसरे असलेले मुलायम सिंह यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे मे 2003 मध्ये निधन झाले. अखिलेश यादव हे मुलायम यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रापासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे. मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक आहेत. 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. गेल्या काही वर्षांत देशात जेव्हा जेव्हा तिसर्‍या आघाडीची चर्चा होते तेव्हा मुलायमसिंह यादव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. पेशाने शिक्षक असलेल्या मुलायमसिंह यादव यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रानेही राजकीय दरवाजे उघडले. 1992 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 5 डिसेंबर 1989 ते 24 जानेवारी 1991, 5 डिसेंबर 1993 ते 3 जून 1996 आणि 29 ऑगस्ट 2003 ते 11 मे 2007 या कालावधीत ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. याशिवाय ते केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशातील यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात.

COMMENTS