Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवराजांचा बालिशपणा समजू शकतो, पण ज्येष्ठ नेते तुम्ही सुद्धा !

गोधेगाव कार्यकर्ता प्रवेशावरून सरपंच अशोक भोकरेंची कोल्हेंवर सूचक टीका

कोपरगाव प्रतिनिधी  :- आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे राजकारण म्हटले की, या पक्षाचे कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात जाणे स्वाभाविक

Sangamner : जि प सदस्य सिताराम राऊत यांनी शासनाच्या निधीचा केला गैरवापर (Video)
पांढऱ्या कपड्यातील साखर कारखानदार सर्वात मोठे दरोडेखोर ; शेट्टी
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची वृत्त लोकांची दिशाभूल करणारे

कोपरगाव प्रतिनिधी  :- आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे राजकारण म्हटले की, या पक्षाचे कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात जाणे स्वाभाविक आहे तो राजकारणाचा एक भाग आहे. मात्र जे कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात गेलेच नाही त्या कार्यकर्त्याच्या नावाने युवराजांनी बालिशपणा करून बातमी प्रसिद्ध केली असती तर आम्ही समजू शकतो, कारण ते राजकारणात अजून नवीन आहेत. मात्र गोधेगाव(Godhegaon) येथील काळे गटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश अशा आशयाची बातमी प्रसिद्ध करून ज्या कार्यकर्त्यांनी कोल्हे गटात प्रवेश केलाच नाही त्या काळे गटाच्या कार्यकर्त्यांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करून संभ्रम निर्माण करायचा हे ज्येष्ठ नेत्यांकडून आम्हाला अपेक्षित नाही. याबाबतीत युवराजांचा बालीशपणा आम्ही समजू शकलो असतो मात्र ज्येष्ठ नेते तुम्ही सुद्धा अशी सूचक टीका गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे(Ashok Bhokare) यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे( Bipin kolhe) व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे(Shankarao Kolhe) कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे(Vivek Kolhe) यांचे नाव न घेता केली आहे. कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील काही कार्यकर्त्यांनी नुकताच कोल्हे गटात प्रवेश केला याबाबतचे वृत्त संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या समवेत वृत्तपत्र तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाले त्याबाबत गोधेगावचे काळे गटाचे सरपंच अशोक भोकरे यांनी सदर वृत्त चुकीचे असल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करून  अप्रत्यक्षपणे कोल्हेंवर निशाणा साधला आहे. सरपंच भोकरे यांनी असे म्हटले आहे की, कोल्हे गटाकडून कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही कार्यकर्ते गेलेही असतील मात्र ज्या कार्यकर्त्यांनी कोल्हे गटात प्रवेश केलाच नाही अशा देखील काळे गटाच्या कट्टर कार्यकर्त्यांची नावे प्रसिद्ध करून या कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम कोल्हे गटाने केले आहे. यामध्ये गुलाब गणपत भोकरे,(Gulab Ganpat Bhokare) गणपत पाराजी भोकरे(Ganpat Paraji Bhokare), राहुल यशवंत चंदनशिव(Rahul Yashwant Chandanshiv), शरद यशवंत चंदनशिव(Sharad Yashwant Chandanshiv), नारायण गीताराम नवले(Narayan Geetaram Navale), शामराव रामदास सोळसे(Shamrao Ramdas Solase), पुंजाहारी आनंदा भोकरे(Punjahari Ananda Bhokare) हे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते तरी त्यांच्या प्रवेशाची खोटी माहिती वृत्तपत्रात देण्यात आली आहे. त्यामुळे गावागावात अंतर्गत कलह निर्माण होवून गावातील एकोप्याला बाधा येवू शकते. यासाठी तुम्ही कितीही कार्यकर्त्यांचा प्रवेश करून घ्या मात्र ज्यांनी प्रवेश घेतला अशाच कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करा. मात्र ज्या कार्यकर्त्यांचा काही संबंध नाही अशा कार्यकर्त्यांबाबत चुकीचे वृत्त प्रसिद्ध करून त्यांना मानसिक त्रास देवू नका. स्व. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे(self Former MP Karmaveer Shankaraoji Kale) आणि स्व. शंकररावजी कोल्हे(self Shankaraoji Kolhe) यांचे नाव घेतले म्हणजे सभ्य राजकारणी अशी प्रतिमा निर्माण होत नाही. त्यासाठी त्यांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे. आपले युवराज राजकारणात नवीन आहेत त्यांच्या अंगी हे गुण येण्यास अवधी लागणार आहे. मात्र आपण ज्येष्ठ आहात आम्हाला आपल्याकडून अशी अपेक्षा नाही. त्यामुळे यापुढे कोल्हे गटात प्रवेश करीत असलेल्या कार्यकर्त्यांची अगोदर खातरजमा करा नंतर बातमी प्रसिद्ध करा. मात्र चुकीचे वृत्त प्रसिद्ध करून स्वत:च्या हाताने स्वत:चे हसू करून घेवू नका असा उपरोधिक सल्ला सरपंच अशोक भोकर यांनी शेवटी  कोल्हेंना दिला आहे.             

COMMENTS