झाडावरच्या बोरांच्या आमीषाने मुलाला गमवावा लागला प्राण…

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

झाडावरच्या बोरांच्या आमीषाने मुलाला गमवावा लागला प्राण…

अहमदनगर/प्रतिनिधी : बोरं काढण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षांच्या बालकास विहिरीत जलसमाधी मिळाली. दोन वर्षापूर्वीच अल्पशा आजाराने मातृत्वाचे छत्र हिरावून

पारनेरच्या भाळवणीत सापडला जिवंत बॉम्ब !
जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शकपदी अशोक (बाबूशेठ) बोरा यांची निवड
इंधन दरवाढीवरून केंद्र-राज्य संघर्ष

अहमदनगर/प्रतिनिधी : बोरं काढण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षांच्या बालकास विहिरीत जलसमाधी मिळाली. दोन वर्षापूर्वीच अल्पशा आजाराने मातृत्वाचे छत्र हिरावून घेतल्याने पोरक्या झालेल्या हा 11 वर्षाचा चिमुकला झाडावरील बोरं काढताना तोल जावून विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे घडली. अभिषेक बाळू लकडे असे या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे गावासह लकडे परिवारावर शोककळा पसरली. येळपणे परिसरातील ठाणगेवाडी येथील अभिषेक लकडे हा विहिरीच्याकडेला असलेल्या एका बोराच्या झाडावरील बोरे काढण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा तोल गेला अन् तो थेट विहिरीत पडला, त्यामध्येच त्याचे दुर्दैवी निधन झाले. विहिरीच्याकडेला त्याची चप्पल दिसल्याने आत पाहिले असता तो विहिरीत दिसला. त्याला बाहेर काढले. पण त्याचा मृत्यू झाला होता. तो खंडेश्‍वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. दोन वर्षापूर्वीच त्याच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

COMMENTS