Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्याधिकारी साहेब झोपेतून उठाअशोक नगरसह अनेक भागात पाईपलाईन फुटल्याने लोकांच्या घरात शिरले पाणी

नागरिकांचे जीवन धोक्यात

परळी प्रतिनिधी - पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने गेल्या चार दिवसापासून अशोक नगर व आजूबाजूच्या वस्तीमध्ये पिण्याचे पाणी लोकांच्या घरात घुस

LokNews24 : शिवसेना दसरा मेळावा | उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण अनकट
गुजरातच्या रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक
मोठी दुर्घटना ! शिकाऊ विमान कोसळून अपघात.

परळी प्रतिनिधी – पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने गेल्या चार दिवसापासून अशोक नगर व आजूबाजूच्या वस्तीमध्ये पिण्याचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून बाजूलाच असलेल्या विजेच्या फुलामुळे जिवीतास  धोका  निर्माण झाला आहे. मुख्याधिकारी साहेब झोपेतून उठा आणि लोकांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्या अशी संतप्त भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
नगरपालिका चा भोंगळा कारभार परळी शहरामध्ये अनेक गल्लीबोळात नागरिकांना पिण्याचे पाण्याची सोय नगरपालिका मार्फत देण्यात आली असून काही भागांमध्ये नगरपालिकांच्या पाणीपुरवठाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे परळीतील उड्डाणपूल शिवाजीनगर इराणी वस्ती आंबेडकर नगर अशोक नगर या भागामध्ये सलग चार दिवसापासून नळा मधून पाणी वाहत असल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी साठवंडा होत आहे व चिखल झाल्यामुळे इथल्या नागरिकांना करण्यासाठी खूप त्रास होत आहे. या पाण्यामुळे विद्युत पुरवठा करणारे लाईटचे खांब सुद्धा आहेत व या पाणी सांडल्यामुळे लाईटच्या खंब्यामध्ये करंट उतरण्याची शक्यता नकारली जात नाही व या ठिकाणी तीन दिवसांमध्ये लाखो लिटर पाणी विनाकारण सांडत आहे व येणार्‍या दुष्काळामध्ये या पाण्याची आवश्यकता परळी शहरांमध्ये अनेक नागरिकांना भोवत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी न मिळाल्याने खूप कष्ट नागरिकांना घ्यावा लागले. याचाच फटका संपूर्ण परळीकरांना बसत आहे. व लाखो लिटर पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणी निरीक्षण म्हणून नगरपरिषदेचे पाणीपुरवठा कोणतेही अधिकारी व कर्मचारी जातीने लक्ष न घातल्यामुळे पाण्याची बरबादी होत आहे  पाणीपुरवठा कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी हे पाईप लावून गेल्या चार दिवसापासून फुटले आहे ते तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना होणार्‍या त्रासातून मुक्त करावे याची जबाबदारी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांची आहे त्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी भावना या भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

COMMENTS