मुंबई/प्रतिनिधी ः तलाठी भरती परीक्षांवरील ग्रहण काही सुटायच नाव घेत नाही. सोमवारी मुंबईत तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत. मात्र, आजही या परीक्षे
मुंबई/प्रतिनिधी ः तलाठी भरती परीक्षांवरील ग्रहण काही सुटायच नाव घेत नाही. सोमवारी मुंबईत तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत. मात्र, आजही या परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. पवई आयटी पार्क या परीक्षा केंद्रावर हा गोंधळ झाला आहे. पवई आयटी पार्क सेंटरवर परीक्षेसाठी आलो तेव्हा वेळेआधीच गेट बंद करण्यात आले होते, असा आरोप विद्यार्थिंनी केला आहे. गेट बंद असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकल्याचेही समोर येत आहे. एवढा प्रकार होऊनही परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठीही कोणीही न आल्याने विद्यार्थी चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला.
मुंबईत सोमवारी तलाठी भरती परीक्षेचा पेपर होता. पवई आयटी पार्क परीक्षा केंद्रावर उमेदवारांना सकाळी 8 वाजता हजार राहण्याचे सांगण्यात आले होते. सकाळी 9 वाजता या केंद्रांवर परीक्षेच्या सत्र 1 मधील पेपर हा सुरू होणार होता. परीक्षेपूर्वी आणि दिलेल्या वेळेनुसार विद्यार्थी उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचले. मात्र, दिल्या गेलेल्या वेळेपूर्वीच परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. यामुळे मुंबईबाहेरून आलेले तब्बल 80 ते 90 विद्यार्थी हे केंद्राबाहेरच राहिले. त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे विद्यार्थी हे संतप्त झाले होते. एवढेच नाही तर मुलांशी संवाद साधायला देखील कुणी नव्हते. यामुळे गोंधळ आणखीनच वाढला. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. यावेळी विद्यार्थी म्हणाले, आम्ही वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचलो. मात्र, वेळेपूर्वीच या परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. शिवाय, घडल्या प्रकाराबद्दल आम्हाला कोणतीही माहिती किंवा कारण देण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणताही केंद्र अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे आम्ही जाब विचारणार कुणाला असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी पोलिसांनी दखल घेत मुलांना शांत केले. जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.
COMMENTS