Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रससमोर पक्षफुटीचे आव्हान

देशामध्ये सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला सुरूवात होत आहे. या पाच राज्यामध्ये आघाडी घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्च

वायूप्रदूषण चिंताजनक  
पाणीटंचाईचे संकट
पोटभर जेवणासाठी संघर्ष !

देशामध्ये सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीला सुरूवात होत आहे. या पाच राज्यामध्ये आघाडी घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यामुळे सत्ता कुणाच्या पारड्यात जाते, याचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार असला तरी, भाजप सध्या सेफ झोनमध्ये असल्याचे एकंदरित चित्र आहे. त्यांच्याविरोधात लाट तयार होत असली तरी, त्यांचा पारंपारिक मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता तशी कमीच आहे. याउलट काँगे्रसमध्ये सध्या वातावरण ऊर्जेचे असले तरी, काँगे्रसला पक्षफुटीपासून वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. काँगे्रसची पायामुळे खोलवर खेड्या-पाड्यापर्यंत, वाड्या-वस्त्यांपर्यंत रूजलेली आहे. त्यामुळे काँगे्रसला हरवणे तसे सोपे नाही. मात्र काँगे्रसचे जे काही पराभव होत आहे, ते काँगे्रसच्या अंतर्गत गटबाजीमुळेच. त्यामुळे काँगे्रसच स्वतःला हरवू शकते, असे म्हटल्यास नवल वाटायला नको.  2014 नंतर देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काँगे्रस अगदी गलितगात्र झाली होती. 2014 ते 2019 मध्ये काँगे्रसने कधी तोंड वर काढलेच नाही. किंवा काँगे्रसच्या कोणत्याही नेत्याने या पाच वर्षांमध्ये आपल्या पक्षाला राष्ट्रीय कार्यक्रम दिला नाही. त्यामुळे या काळामध्ये काँगे्रसचे धोरण मवाळच राहिल्याचे दिसून येते. परिणामी या पाच वर्षांमध्ये देशामध्ये प्रभावी विरोधी पक्षनेत्याची भूमिका काँगे्रसने पार पडली नाही. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळे असे राजकीय गणित जन्माला येण्याची शक्यता नव्हतीच. त्यानंतर 2022 च्या मध्यापर्यंत म्हणजे अडीच ते तीन वर्ष काँगे्रस विजनवासातच असल्याचे दिसून येते. पक्षाला कोणताही कार्यक्रम नाही, धोरणे प्रभावी मांडण्यासाठी कोणताही नेता पुढे येतांना दिसून आलेला नाही. त्यामुळे काँगे्रसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले. आणि ते खरेही होते. कारण पक्षाला अनेक वर्षांपासून अध्यक्ष नव्हता, ध्येयधोरणे ठरवतांना, कार्यक्रम देतांना अडचणी येत होत्या, त्यामुळे पक्षातील पवित्रा घेतला. आणि तेथूनच काँगे्रसला जाग आली. शिवाय अनेक नेते तुरुंगात जात होते. यातच काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडोच्या माध्यमातून पक्षाला नवसंजीवनी दिली. तसेच पक्षाला नवा अध्यक्ष मिळाला असला, तरी पक्षासमोर पक्षफुटी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर काँगे्रसमध्ये अंतर्गत गटबाजीला आवरणे गरजेचे आहे. राजस्थानमध्ये सध्या काँगे्रसची सत्ता असली तरी, या राज्यात दोन गट स्पष्टपणे दिसून येतात. अशोक गेहलोत आणि दुसरा सचिन पायलट यांचा गट. गेहलोत आणि पायलट यांच्या गटामुळे काँगे्रसला यंदा या राज्यात मोठा फटका बसू शकतो, त्यामुळेच काँगे्रसने निवडणुकीत डॅमेज कंट्रोल रोखण्याची गरज आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याची गरज आहे. खरंतर गेहलोत यांना आजही मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. कारण त्यांची सर्वसमावेशक अशी भूमिका राहिलेली आहे. तर दुसरीकडे पायलट यांची मुख्यमंत्रिपदाची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे हा सुप्त संघर्ष काँगे्रसच्या पराभवाला कारणीभूत ठरतो. राजस्थानमध्ये नेहमीच आलटून-पालटून सत्ता येतांना दिसून येते. त्यामुळे यंदा भाजपचे पारडे जड वाटत असले तरी, राष्ट्रीय स्तरावरचा विचार करता भाजपविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे दिसून येत आहे. मात्र राजस्थानात काँगे्रसविरोधातही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षाची कसोटी याठिकाणी लागणार आहे. राजस्थानमध्ये काँगे्रसची तर, मध्यप्रदेशात भाजपची कसोटी लागणार आहे. 

COMMENTS