Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज तालुक्यातील लव्हुरी येथील सिमेंट रस्त्याचे चालू काम सोडून पळालेल्या गुत्तेदाराने केले काम चालू

पाणी मारताना कुचराई, पाणी मारुन सुध्दा रस्ता कोरडाच.

केज प्रतिनिधी- केज तालुक्यातील लव्हुरी येथे गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वी पासून सिमेंट रस्त्याचे काम चालू होते.सदरील रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत

प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल
जागतिक हेपाटायटिस दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे साजरा
मराठी भाषेविषयी केंद्राची अनास्था

केज प्रतिनिधी- केज तालुक्यातील लव्हुरी येथे गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वी पासून सिमेंट रस्त्याचे काम चालू होते.
सदरील रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत असल्याची तक्रार गावातील काही मंडळींनी केली असता गुत्तेदाराने आपला गाशा गुंडाळून पळ काढला होता.परंतु तेच काम आज चालू केले असून रोडचे पूर्ण काम झालेल्या रस्त्यावर टँकरने पुढे पाणी मारत असताना पाठीमागून मागून रस्ता कोरडाच दिसून येत होता सदरील गुत्तेदारानेकेलेल्या रस्त्याच्या कामावरमातीची चौकोन देखील केलेले नसल्याचे दिसून येत आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते तर सदरील काम करत असतानाखडीकरण मजबूत करणे आवश्यक होते परंतु उकडलेल्या रस्त्यावर असेच खडी वाळू कालवून या रस्त्याचे काम निक्रष्ट दर्जाचे होत आहे गुत्तेदाराची प्रशासकीय अधिकारी  यांच्याशी हात मिळवणी केली काय? अशी चर्चा स्थानिक नागरिक असून ऐकावयास मिळाली आहे. केज तालुक्यातील लव्हूरी येथे शासनाच्या विविध विकास योजना राबवत असताना प्रत्येक योजने मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सामान्य नागरिकांतून चर्चा ऐकण्यास मिळत असून या प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देईल का? प्रशासन भ्रष्ट काम करणार्‍या वर कारवाई करेल का?अशी देखील नागरिकात चर्चा रंगत आहे.जर असे कामे झाली तर रस्ता जास्त काळ टिकेल काय? सदरील रस्त्याच्या कामासंदर्भात प्रशासन काय भूमिका घेते याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS