नेवासाफाटा : तालुक्यातील गावांमधील शेत रस्ते, शिवरस्ते व शिव पानंद रस्ते केसेस प्रकरण मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत प्रलंबित रस्ता केसेस प्रकरणाबाबत
नेवासाफाटा : तालुक्यातील गावांमधील शेत रस्ते, शिवरस्ते व शिव पानंद रस्ते केसेस प्रकरण मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत प्रलंबित रस्ता केसेस प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, त्यामुळे या प्रकरणाचा त्वरित निपटारा करावा अशी मागणी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे नेवासे तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्हा शिव रस्ते व शिव पानंद रस्ते समस्या निवारण संघटना शेतकरी विकास परिषदेचे अध्यक्ष व व शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद राव पवळे यांचे व उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे सुरेगावकर यांचे मार्गदर्शनाखाली 18 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे पेरू आंदोलन केले होते पेरू आंदोलनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या आंदोलनाच्या वेळी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी शेत व शिव रस्ते या प्रकरणाबाबत वैयक्तिक लक्ष घालतो, त्वरित उपविभागीय प्रांत अधिकारी यांची बैठक लावून सर्व तालुक्यातील तहसीलदाराकडून शेत रस्ते समस्या प्रकरणाबाबत कारवाई करण्याची सूचना देतो असे आश्वासित करून 23 डिसेंबर 2000 पासून महाराजस्व अभियान राबविण्याचे परिपत्रकही काढले होते. या तारखेनुसार कार्यक्रम जाहीर केला परंतु या महाराजस्व अभियानाच्या परिपत्रकाचा नेवासा तालुक्यातील तहसीलदार यांनी कोणताही प्रकारचा पाठपुरावा न करता महाराजस्व अभियानाचा पूर्णपणे बोजवारा उडविला असून या परिपत्रकाला केराची टोपी दाखवली असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाथाभाऊ शिंदे यांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे नुकतेच 7 ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील शेत व शिवरस्ते पेंडिंग प्रलंबित केसेस संदर्भात त्वरित निपटारा करण्यासाठी तहसीलदारांना आदेश आदेश करावेत असे निवेदन नुकतेच नाशिक येथे दिले आहे समवेत बबन नारायण शिंदे सगाजी शंकर ऐनर इत्यादी उपस्थित होते. त्यावेळी सुरेगाव बेलपांढरी शिव रस्ता 2008 पासून अतिक्रमण मुक्त करण्याचे प्रकरण प्रलंबित आहे तसेच धनगरवाडी तामसवाडी शिव रस्ता प्रकरण बलंबित आहे नेवासा बुद्रुक येथील बहिरवाडी नेवासा बुद्रुक शिवरस्ता 2017 पासून अतिक्रममुक्त करणे आहे व इतरही काही शिव रस्ते व शेत रस्ते प्रकरणी प्रलंबित आहे याबाबत प्रवीण गेडामयांच्याशी समक्ष चर्चा झाली असून यांनी या प्रकरणाबाबत लक्ष घालून तहसीलदारांना त्वरित आदेश देतो असे आश्वासित केले.
COMMENTS