Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीच्या आधी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

अजित पवार गटाला मिळणार तीन मंत्रिपदे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि केंद्रातील आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, मोदी सरकार देखील आपल्या सरकारचा शेवटचा म

महावितरणमध्ये संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
डेझी शाहची मराठीत धमाकेदार एण्ट्री
मुंब्रा रेल्वे स्थानकाला मुंब्रा देवीचे नाव देण्यात यावे ; मनसेची मागणी 

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि केंद्रातील आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता, मोदी सरकार देखील आपल्या सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीच्या आधी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यामध्ये अजित पवार गटाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कारण केंद्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद तर, राज्यात अजित पवार गटाला दोन राज्यमंत्री पदे मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. शिवाय शिंदे गटाला देखील मंत्रिपदे मिळणार आहेत. घटस्थापनेनंतर व दिवाळीच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या बर्‍याच काळापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्याआणखी आमदारांना संधी मिळणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात चार मंत्र्यांची भऱ पडणार आहे. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद अजित पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त लागल्याने मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या आमदारांमध्ये उत्साह आहे. मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात 8 मंत्रिपदे भाजपकडे जाऊ शकतात तर सहापदेशिंदे गट व अजित पवार गटांना दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदासाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच केंद्रात देखील 1 कॅबिनेटपद अजित पवार गटाच्या वाट्याला येऊ शकतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे. त्या प्रकारचं आश्‍वासन अजित पवार यांना सत्तेत सहभागी होतानाच दिल्याचं बोललं जातंय.

COMMENTS