Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बस झाडाला अडकली अन् प्रवासी बचावले

रायगड ः अलिबाग वडखळ मार्गावरील कार्ले खिंड येथील वळणावर एका एसटी बसला अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी 8.15 च्या सुमारास घडली आहे. ही बस थेट दरी

जय श्रीरामच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली !
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर ते नागपूर विशेष ट्रेन धावणार
23 रोजी नांदेड येथे  सर्वधर्मीय सामुहिकविवाह मेळावा 

रायगड ः अलिबाग वडखळ मार्गावरील कार्ले खिंड येथील वळणावर एका एसटी बसला अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी 8.15 च्या सुमारास घडली आहे. ही बस थेट दरीच्या दिशेने निघाली होती. पण रस्त्याच्या बाजूला असणार्‍या एका झाडाला ती अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे. अलिबाग आगारातून सकाळी 7.45 च्या सुमारास अलिबाग – पनवेल बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती. ती कार्ले खिंडेतील धोकादायक वळणावर येताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र बस झाडावर अडकल्याने पुढील अनर्थ टळला.

COMMENTS