बुलढाणा प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यात नादुरुस्त बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बोथा घाटात एस.टी.महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली आहे. य

बुलढाणा प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यात नादुरुस्त बसच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बोथा घाटात एस.टी.महामंडळाच्या बसने दुचाकीला जबर धडक दिली आहे. या धडकेत एकजण जागीच ठार तर दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये गजानन शेळके वय 55 हे जागीच ठार झाले तर प्रकाश जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गजानन शेळके हे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे कक्षसेवक म्हणून कार्यरत होते . यामुळे बस चालकांनी गाडी चालवताना काळजी घेण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
COMMENTS