रायपूर प्रतिनिधी - लग्नानंतर रिसेप्शनसाठी तयार होण्यासाठी गेलेल्या नवरदेव आणि नवरीचा एकाच खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नवरदेवाने आधी आ
रायपूर प्रतिनिधी – लग्नानंतर रिसेप्शनसाठी तयार होण्यासाठी गेलेल्या नवरदेव आणि नवरीचा एकाच खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नवरदेवाने आधी आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. ही घटना रायपूरच्या टिकरापारा परिसरात घडली आहे. दोघांचे 19 फेब्रुवारी रोजी लग्न झाले होते, त्यानंतर दोघंही 21 फेब्रुवारीला रिसेप्शन पार्टीसाठी तयार होण्यासाठी रूममध्ये गेले. दरम्यान, दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला, त्यानंतर अस्लमने आपल्या कहकाशा बानोवर चाकूने वार केले. या हल्ल्यात नवरी गंभीर जखमी झाली, त्यानंतर अस्लमने स्वतःवरही वार केले. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून, पुढील तपास सुरू आहे. संतोषी नगर नई बस्ती येथील रहिवासी असलमने 19 फेब्रुवारीला राजातालाब येथील रहिवासी कहकशा बानोसोबत लग्न केले होते. 21 फेब्रुवारीला रिसेप्शन होते. यासाठी दोन्ही घरातील सदस्य तयारी करत होते. दरम्यान, दोघेही तयार होण्यासाठी खोलीत गेले असता दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यानंतर वराने वधूवर चाकूने वार केले आणि नंतर स्वतःलाही चाकूने वार करून जखमी केले. या घटनेची माहिती इतरांना मिळताच एकच गोंधळ उडाला. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
COMMENTS