Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंद इमारतीत आढळला युवकाचा मृतदेह

मुंबई ः विक्रोळी पूर्वच्या स्टेशन पूर्व रोड परिसरात पडीक इमारतीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यां

चित्रपटगृहे, नाट्यगृहांच्या रंगभूमी करात वाढ
स्वा.सावरकर उद्यानात अमृतवन परिवाराचे झेंडावंदन
बीड जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न

मुंबई ः विक्रोळी पूर्वच्या स्टेशन पूर्व रोड परिसरात पडीक इमारतीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. इमारतीमध्ये मृतदेह आढळल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृतदेह पाण्यात असल्याने त्याचा वास परिसरात सर्वत्र पसरला होता. घटनास्थळी अग्निशमन दल व विक्रोळी पोलीस ठाणे पोलीस पोहोचले व या मृतदेहास ताब्यात घेतले आहे. पुढील क्रियेसाठी या मृतदेहास जवळील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS