Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरूणीचा मृतदेह आढळला गोणीत

मुंबईतील वरळी सी फेसवरील घटना

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबख उडाली आहे. मुंबईतील वरळी सी फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला. एक

मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे LokNews24
अवैध सावकारी करणार्‍यांच्या घरावर छापे
ग्रामीण रुग्णालय राहुरी शहरातच राहणार

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबख उडाली आहे. मुंबईतील वरळी सी फेसवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला. एका गोणीत हा मृतदेह होता. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह गोणीत होता. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी सी फेसवर एका गोणीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षेला जाणार्‍या एका तरुणीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशिद बंदर स्थानकादरम्यान एका व्यक्तीनं लोकलमध्ये शिरुन लैंगिक अत्याचार केला होता. तसेच, चर्नी रोड ते चर्चगेट स्थानकादरम्यान लोकलमध्ये एका महिलेचा अज्ञाताकडून विनयभंग करण्यात आला होता. त्यासोबतच मिरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरण आणि श्रद्धा वालकर हत्या प्रकरण यांमुळे आधीच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. आता वरळी सी फेसवर आढळलेल्या मृतदेहामुळे खरंच मुंबईत महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

COMMENTS