शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले

8 आठवड्यांमध्ये नवे विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागणार

शिर्डी प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द झाला आहे. शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. साईमंदिराचे राजकीय व

अतिवृष्टीची भरपाई न दिल्यास जलसमाधी घेणार
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून योग्य दिशेने मार्गक्रमण करावे – भटनागर
कर्मवीरांचा आदर्श माऊली वृद्धाश्रमातील कार्यात ः केरू बारहाते

शिर्डी प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय रद्द झाला आहे. शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. साईमंदिराचे राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश औरंगाबाद हायकोर्टाने दिले आहे. आता 8 आठवड्यांमध्ये नवे विश्वस्त मंडळ स्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला नव्याने विश्वस्त मंडळ नेमावे लागणार आहे. नविन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साईमंदिराचा कारभार पाहणार आहे. शिर्डीतील राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीसाठी  शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांनी याचिका दाखल केलेली होती. आज या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला.

COMMENTS