मिनरल वॉटर म्हटलं की पहिल्यांदा बिसलेरीचं नाव आपल्या तोंडातून येतं. हॉटेल, स्टेशन, दुकानं कुठेही जा आपण पाणी विकत घेताना बिसलेरी द्या असंच म्हण
मिनरल वॉटर म्हटलं की पहिल्यांदा बिसलेरीचं नाव आपल्या तोंडातून येतं. हॉटेल, स्टेशन, दुकानं कुठेही जा आपण पाणी विकत घेताना बिसलेरी द्या असंच म्हणतो.बिसलेरी मिनरल वॉलरमधील अतिशय विश्वासू ब्रँड आहे. पण आता हाच बिसलेरीचा ब्रँड टाटांच्या मालकीचा होणार आहे. बिसलेरी इंटरनॅशनल आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट लिमिटेड यांच्यातील ही डील जवळपास 6000 ते 7000 कोटींची होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही कंपनी विकत घेण्यासाठी नेस्ले आणि रिलायन्स सारख्या कंपन्याही रांगेत होत्या, पण कंपनीचे मालक रमेश चौहान यांनी आपली कंपनी टाटाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांच्या कंपनीला पुढे नेणारा कोणीही उत्तराधिकारी नाही, असं ते म्हणालेत. माझी मुलगी जयंतीला या व्यवसायात विशेष रस नाही. मला या कंपनीला मरू द्यायचं नाही, त्यामुळे ती विकण्याचा निर्णय मला घ्यावा लागला, असं रमेश चौहान यांनी सांगितलं आहे.
COMMENTS