Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्यांनीच रिक्षात सोडले नवजात बालकाला

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुहू गल्ली परिसरात राहणार्‍या एका दाम्पत्याने आपल्या 2 दिवसाच्या न

एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या
अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य
करंजी परिसराला वादळी वार्‍यांसह गारांचा फटका

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुहू गल्ली परिसरात राहणार्‍या एका दाम्पत्याने आपल्या 2 दिवसाच्या नवजात बाळाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर याच आई-वडिलांनी आपल्या नवजात बालकाला रिक्षात सोडून दिल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्टच्या मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास जुह गल्ली परिसरात राहणारे इमरान सैनूर खान (वय 28) त्याची पत्नी रहनुमा इमरान खान (वय 25) या दाम्पत्याने आपल्या दोन दिवसाच्या बालकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. तक्रार प्राप्त होताच जुहू पोलिसांनी बाळाचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी इमरानच्या घराशेजारी राहणार्‍या नागरिकांची देखील चौकशी केली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी या दाम्पत्याला बाळ झाले होते, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे नवजात बाळाचे अपहरण नेमके कुणी केले असेल? असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनि गणेश जैन पोलिस उपनिरीक्षक सीमा फरांदे, पोलिस हवालदार पाटील, पोलिस हवालदार खोमणे, पोलिस शिपाई कणमुसे, पोलिस शिपाई पन्हाळे या तपास पथकाने बाळाच्या आई-वडिलांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर समोर जे सत्य आले, ते ऐकून पोलिसही चक्रावले. जन्मदात्यांनीच आपल्या नवजात बालकाला सांताक्रुज पश्‍चिम येथील खिरानगर परिसरात पार्क केलेल्या रिक्षामध्ये सोडून दिल्याचे कबुली दिली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सांताक्रुज पोलिसांना संपर्क साधला असता 30 जुलै रोजी ऑटोरिक्षामध्ये नवजात अर्भक सापडले असल्याचे समजले. यासंदर्भात सांताक्रुज पोलिस ठाणे येथे कलम 317 भादंवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यानंतर जुहू पोलिसांनी इमरान खान व रहनुमा खान यांना सांताक्रुज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जन्मदात्या आई-वडिलांनीच दोन दिवसांच्या बाळाला रिक्षामध्ये सोडून दिल्याचे समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS