Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्या आईनेच घेतला पोटच्या मुलांचा जीव

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणभावाचा राहत्या घरता संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांन

डॉक्टर प्रेयसीवर सर्जिकल ब्लेडने हल्ला
चेंबरमधे गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतला हुर्डा खाण्याचा आस्वाद

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणभावाचा राहत्या घरता संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे दोघेही रात्री आई वडिलांसोबत जेवण करून झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत सापडले. कुटुंबीयांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. 

मुलांचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगाने तपासणी सुरू केली असून त्यावेळी दोन्ही मुलांच्या जन्मतात्या आईनेच रात्री मुले झोपेत असतानाच त्यांची गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. यांनतर पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले आणि कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे की तिने आपल्या दोन्ही मुलांना का मारले. पोलिसांच्या तपासणीत हे ही लक्षात आले आहे की आरोपी आई मनोरुग्ण आहे. 

COMMENTS