Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सो कलमान्वये गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः पोटच्या अल्पवयीन मुलीवर (वय 14) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम ब

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्‍वेतपत्रिका काढा
गोधेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब शेळके
अहमदनगर मधील सीना नदी पूरनियंत्रण रेषेचे होणार फेर सर्वेक्षण

अहमदनगर/प्रतिनिधी ः पोटच्या अल्पवयीन मुलीवर (वय 14) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरूध्द येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बापाने त्याच्या अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिचा हात पिरगळला. तिच्यावर 15 एप्रिल 2022 रोजी दुपारी पुणे येथे अत्याचार केला. त्यानंतर 12 जून 2022 रोजी सायंकाळी मामाच्या गावी सोडण्यासाठी घेऊन जात असताना कोल्हार घाट बहीरवाडी शिवार (ता. नगर) येथील जंगलात तिच्यावर अत्याचार केला. ही घटना आई व बहिणीला सांगितल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पिडीत मुलीने आईस सांगितल्याने मुलींच्या आईने या बाबत विचारणा केली असता पिडीतेच्या आईला व बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.पीडितेच्या आईने मानसिक आधार दिल्यावर तिने गुरूवार, 15 डिसेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडितेच्या बापाविरोधात भारतीय दंड संहिता तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे आदींनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

COMMENTS