Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड शहरातील थकबाकीदार आता झळकणार फ्लेक्सवर

कराड / प्रतिनिधी : शासकीय कार्यालयांसह शहरातील करवसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर लिहून ते फ्लेक्स स

राज्य सरकार साखर कारखानदारीच्या पूर्णपुणे पाठीशी : पालकमंत्री
कामावर हजर होणार्‍या एसटी कर्मचार्‍यांना अडवू नका; अन्यथा गुन्हे दाखल करू
मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक

कराड / प्रतिनिधी : शासकीय कार्यालयांसह शहरातील करवसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर लिहून ते फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत. शासकीय कर वसुलीसाठी पालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 5 कोटींची वसुली पालिकेने केली आहे. अद्याप 14 कोटींची थकबाकी आहे. त्यात शासकीय कार्यालयांची सव्वाकोटीच्या आसपास वसुली बाकी आहे. त्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. कराड शहराचे चार वेगवेगळे भाग करून पाच पथकांकडे वसुलीची जबाबदारी दिली असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.
शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, पंचायत समिती उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील 12 हून अधिक शासकीय कार्यालयांकडे 5 वर्षांपासून पालिकेची तब्बल सव्वाकोटीचा कर थकवला आहे. त्यासोबत शहरातील नागरिकांकडून पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकी आहे. पालिकेला कोरोनामुळे कोणतेही उत्पन्नाचे मार्ग नसल्याने पालिकेने करवसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पाणी व घरपट्टीच्या वसुलीसाठी मोठे निर्णय मुख्याधिकारी रमाकांत डाके घेत आहेत. शहरातील मोठ्या थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर लिहून ते फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत, अशी माहिती डाके यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पालिकेचा संकलित कर भरून सहकार्य करण्याचे आवाहन डाके यांनी केले आहे. शहराचे चार वेगवेगळे भाग करून तेथील नागरिकांच्या थकीत कराच्या वसुलीसाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. शासकीय थकबाकी कोटीच्या घरात आहे. या वसुलीचे आव्हान आहे.

शासकीय कार्यालयांचा थकीत कर
कराड प्रांताधिकारी 11 लाख 46 हजार 142 दोन लाख 50 हजार 901, कराड तहसीलदार 32 लाख 96 हजार 568 32 हजार 802, कराड पंचायत समिती एक लाख 64 हजार 807, वेणूताई उपजिल्हा रुग्णालय कराड 17 लाख 97 हजार 435, बीएसएनएल 15 लाख 8 हजार 611, जिल्हा परिषद बांधकाम तीन लाख 77 हजार 887, सार्वजनिक बांधकाम 3 लाख 3 हजार 145, सातारा जिल्हा परिषद 2 लाख 85 हजार 437, कृष्णा कालवा उपविभाग 2 लाख 67 हजार 49, रेव्हेन्यू क्लब 11 लाख 29 हजार 683.

COMMENTS