Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

वर्षभरात ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्धार

नाशिक : लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचची सर्वसाधारण सभा (२६ नोव्हेंबर) रोजी सारडा कन्या विद्यालयात मंचचे अध्यक्ष रंजनभाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली

आमदार अपात्रता निकालाबाबत नार्वेकरांना सर्वोच्च नोटीस
जामखेड तालुक्याचा नवोदय विद्यालय परीक्षेत डंका
महापालिकेच्या स्मशानभूमीतील शवदाहिणीचा स्फोट | LOKNews24

नाशिक : लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचची सर्वसाधारण सभा (२६ नोव्हेंबर) रोजी सारडा कन्या विद्यालयात मंचचे अध्यक्ष रंजनभाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संघाच्या उपक्रमाविषयी मंचचे सचिव रमेश डहाळे यांनी माहिती दिली तर कोषाध्यक्ष जितेंद्र येवले यांनी मंचाच्या वर्षभरातील जमाखर्चाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. यावेळी उपस्तितांनी लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे प्रत्येक वर्षाचा चढता आलेख पाहून समाधान व्यक्त केले व वर्षभरात ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार केला.

यावेळी उपस्थित सभासदांनी विविध मुद्यांवर आपले मते मांडली व या मतांचा आदर करत सचिव रमेश डहाळे यांनी येणार्‍या काळात सभासदांच्या सहकार्याने मासिक मिटींग, श्रावण बाळ सत्कार योजना राबविण्यात येणार असल्याचे जाहिर केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात रंजनभाई शाह यांनी सभासदांचे विशेष आभार मानले.

यावेळी वसंतराव पुंड, चेतन पणेर, धनंजय चतूर, विठ्ठलराव सावंत, बाळकृष्ण दंडगांवकर, दिनेश सावंत,बापुराव मेहेत्रे,  गायधनी, डी.एम.कुलकर्णी हरिश्‍चंद्र निंबाळकर, प्रकाश महाजन आदी उपस्थित होते.

COMMENTS