Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले  

साखर कारखानदारांना खायला लावली खर्डा-भाकरी

कोल्हापूर ः एफआरपीच्या प्रश्‍नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनांचे आंदोलक आक्रमक झाले असून, आंदेालकांकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आक्रोश यात्रा

जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन
नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता
आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणार – आ. चंद्रकांत पाटील 

कोल्हापूर ः एफआरपीच्या प्रश्‍नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनांचे आंदोलक आक्रमक झाले असून, आंदेालकांकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आक्रोश यात्रा सुरू आहे. एका बाजूला ऊस तोडणी करणार्‍या आणि वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर्सची तोडफोड तर दुसर्‍या बाजूला साखर कारखानदारांच्या घरात जाऊन खरडा-भाकरी देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरू आहे. मात्र, या वर्षीचे ऊस हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असतानाही साखर कारखानदारांनी अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले आहे.
राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमल महाडिक यांच्या निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल होत त्यांनी, अमल महाडिक यांना खर्डा-भाकरी देऊन कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत. यावेळी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांना खरडा-भाकरी देण्यात आली. महादेवराव महाडिक यांनी आंदोलकांसोबत खरडा-भाकरी खात चर्चा केली. जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवाडे यांनाही आंदोलकांनी खरडा-भाकरी खायला लावली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील उसाला चारशे रुपयांचा भाव मिळावा यासाठी आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलन तीव्र होत आहे. मात्र कारखानदार त्याला जुमानत नाहीत म्हणूनच राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमनच्या दारात खर्डा भाकरी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शेतकर्‍यांची यंदाची दिवाळी गोड होणार नाही म्हणूनच सर्व कारखानदारांना खर्डा भाकरी देण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी करवीर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शिरोलीतील निवासस्थानी खर्डा भाकरी देऊन आंदोलन केले. विशेष म्हणजे महादेवराव महाडिक यांनी स्वतः शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांची खरडा भाकरी स्वतःही खाल्ली आणि कार्यकर्त्यांनाही भरवली. तसेच मागील काही वर्षात राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची ऊस दराची कोंडी आपणच फोडली असल्याचे सांगितेले. तसेच आपणही शेतकर्‍यांच्या बाजूने असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS