Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचा कारभार ऑनलाईनच सुरू

मुंबई/प्रतिनिधी ः कोरोना काळात सुरू करण्यात आलेली ऑनलाईन सुविधा अजूनही अनेक विभागात तशीच सुरु असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेचा उद्यान

मुंबईतील शाळकरी मुलं मधुमेह आणि रक्तदाबाच्या विळख्यात
उष्णतेमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन
डोंगर उतारावर राहणार्‍यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी ः कोरोना काळात सुरू करण्यात आलेली ऑनलाईन सुविधा अजूनही अनेक विभागात तशीच सुरु असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभागात आजदेखील प्रत्यक्ष कार्यालयात न येता आक्षेप आणि सूचना ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची विनंती आजही उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्याबाबत पर्यावरणप्रेमी आणि सूचना-आक्षेप नोंदविणार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहर आणि पूर्व-पश्‍चिम उपनगरांमध्ये मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी यंत्रणांचे विविध प्रकल्प आणि विकासकामे सुरू आहेत. मेट्रो प्रकल्प, रस्ते दुरुस्ती – विस्तारीकरण, मुंबई किनारा मार्ग प्रकल्प, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प, पुलांची पुनर्बांधणी आदी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी मोठ्या संख्येने जुन्या इमारतींच्या पुनर्विकासात टोलेजंग इमारती उभ्या राहात त्यापैकी बहुसंख्य प्रकल्पांच्या आड येणारे वृक्ष हटविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे अर्ज सादर करण्यात येतात. हे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येतात. रस्ते, तसेच नाला रुंदीकरण, मेट्रो मार्गिका, पुनर्विकास आणि अन्य विकासकामांच्या आड येणारे वृक्ष हटविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत होते. स्थळ पाहणी करून, नागरिकांचे आक्षेप, सूचना-हरकती विचारात घेऊन वृक्ष हटविण्याचे अथवा पुनर्रोपित करण्याचे प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येत होते. मात्र करोना संसर्गामुळे या संदर्भातील आक्षेप, सूचना-हरकती सादर करण्यासाठी उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात प्रत्यक्षात हजर न राहता ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत होते. प्रत्यक्ष सुनावणीवरही निर्बंध घालण्यात आले होते. करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व कारभार पूर्ववत झाला आहे. मात्र आजही विकासाआड येणार्‍या वृक्षांची कत्तल किंवा पुनर्रोपणासाठी सादर होणार्‍या प्रस्तावावरील सुनावणीसाठी संबंधितांना करोनाविषयक नियमाचा दाखला देत उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तसेच संबंधितांना आक्षेप, सूचना-हरकती आजही ई-मेलद्वारेच पाठविण्याची सूचना करण्यात येत आहे.

COMMENTS